विराट कोहलीचं Instagram अकाऊंट अचानक गायब, 274 मिलियन फॅन्सला मोठा धक्का; नेटकऱ्यांनी अनुष्काला धारेवर धरलं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Virat Kohli Instagram Account Deactivated : टीम इंडियाचा किंग म्हणजेच विराट कोहली याचं इन्स्टाग्राम अकाऊंड डिअॅक्टिवेट झालं आहे. त्यामुळे आता फॅन्सने तुफान राडा सुरू केलाय.
Virat Kohli Instagram Account Deactivated : भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू विराट कोहली याचे अधिकृत इंस्टाग्राम खाते अचानक बंद (Deactivate) झाल्याने शुक्रवारी ३० जानेवारी २०२६ रोजी खळबळ उडाली आहे. सकाळी क्रिकेट चाहत्यांनी विराटच्या प्रोफाईलवर जाण्याचा प्रयत्न केला असता, तिथे 'दिस पेज इज नॉट अव्हेलेबल' असा मेसेज दिसत होता. २७४ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेले हे खाते अशा प्रकारे गायब झाल्यामुळे सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
Virat Kohli ने अपने 280 million followers वाला इंस्टाग्राम अकाउंट Delete कर दिया,
विराट कोहली जब से प्रेमानंद बाबा की शरण में गए हैं अध्यात्म से जुड़े हैं भक्ति करने लगे हैं सोशल मीडिया छोड़ दिया हैं
क्या विराट कोहली को अपना अकाउंट डिलीट करना चाहिए था लगता है मोह माया त्याग… pic.twitter.com/v4AmD9kv90
— Ranjan Singh (@RanjanSinghh_) January 29, 2026
advertisement
विराट कोहलीच्या व्यवस्थापन टीमकडून किंवा 'मेटा' कंपनीकडून अद्याप याबद्दल कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, विराटचा भाऊ विकास कोहली याचे इंस्टाग्राम खाते देखील याच वेळी बंद झाल्याचे समोर आले आहे. यामुळे हा तांत्रिक बिघाड (Glitch) आहे की विराटने स्वतःहून सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.
advertisement
Twitter has changed the like button to
Virat Kohli's Instagram account is showing unavailable
Top to check #ViratKohli
विराटचे इंस्टाग्राम खाते बंद झाल्याने हवालदिल झालेल्या चाहत्यांनी आता त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला आहे. "भाभी, भाई का अकाउंट कहां गया?" अशा कमेंट्स करत चाहते अनुष्काकडे विराटबद्दल विचारणा करत आहेत. अनुष्काने देखील अद्याप या विषयावर कोणतेही भाष्य केलेलं नाही.
advertisement
दरम्यान, अनुष्का आणि विराट सध्या लंडनमध्ये असून तिथं ते कौटुंबिक वेळ घालवत आहेत. विराटने यापूर्वी एका मुलाखतीत सोशल मीडियामुळे ऊर्जा खर्च होत असल्याचे सांगत डिजिटल जगापासून दूर राहण्याचे संकेत दिले होते. तरीही 274 मिलियन फॉलोअर्स असलेल्या अशा मोठ्या खात्याचे अचानक गायब होणे क्रीडा जगतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 7:33 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
विराट कोहलीचं Instagram अकाऊंट अचानक गायब, 274 मिलियन फॅन्सला मोठा धक्का; नेटकऱ्यांनी अनुष्काला धारेवर धरलं!








