मी सुनेत्रा अजित पवार... उद्याच होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी? बड्या नेत्याचा दावा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मुंबई : अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यामुळे सरकारमध्येही काही बदल होणार आहेत. विशेषतः त्यांच्याकडे असलेले उपमुख्यमंत्री पद, अर्थमंत्री खाते आणि इतर खाती कोणाकडे जाणार? याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीने सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. छगन भुजबळ यांनी देखील मोठा दावा केला आहे. उद्याच बैठक आणि उद्याच निर्णय झाल्यास शपथविधी होईल, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांची उद्या उपमुख्यमंत्रीबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांना उद्या मुंबईत बोलावलं आहे. त्यामुळे उद्या बैठकीत निर्णय झाल्यानंतरर उद्याच शपविधी होईल, असे छगन भुजबळ म्हणाले. उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांची चर्चा सध्या पक्षात सुरू आहे.
छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद द्यावे, अशी पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे.त्यात चूक आहे, असे मला वाटत नाही. सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे सध्या आमचे लक्ष असून उपमुख्यमंत्रीपदाची जागा सुनेत्रा पवारांच्या रुपाने कशी भरता येईल याकडे सध्या आमचे लक्ष आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
advertisement
छगन भुजबळ म्हणाले, दादा गेले आणि त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शो मस्ट गो ऑन असं म्हणतात, त्याप्रमाणे कोणावर तरी जबाबदारी देऊन हा पक्षाचा करभार आणि सरकार पुढे चालवावे लागणार आहे. त्यामुळे उद्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. पक्षाचे प्रमुख पद आता कोणाला द्यायचे याबात बैठकीत निर्णय होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 4:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मी सुनेत्रा अजित पवार... उद्याच होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी? बड्या नेत्याचा दावा









