advertisement

Logic काय? पेनाच्या टोपणाला लहान छिद्र का असतं, 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर

Last Updated:
कदाचित तुम्हाला वाटलं असेल की हे फक्त डिझाइनसाठी आहे किंवा शाई लवकर सुकण्यासाठी. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, हे छोटं छिद्र केवळ डिझाइन नाही, तर ते प्राण वाचवण्यासाठी दिलेलं असतं. पेनच्या टोपणामागचं हे 'सुरक्षा' रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत.
1/7
शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते ऑफिसच्या महत्त्वाच्या करारावर सही करण्यापर्यंत, एक वस्तू कायम आपल्या खिशात असते, ती म्हणजे 'पेन'. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं आणि आपण लॅपटॉपवर कितीही टाईप केलं, तरी कागदावर पेनने लिहिण्याची मजा काही औरच असते. आपण तासनतास पेन हातात धरतो, विचार करताना अनेकदा टोपण (Cap) तोंडाने चावत देखील बसतो किंवा कधीकधी सहज म्हणून त्या टोपणाकडे पाहतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, जवळजवळ प्रत्येक पेनच्या टोपणाला वरच्या बाजूला एक 'छोटं छिद्र' का असतं?

2/7
कदाचित तुम्हाला वाटलं असेल की हे फक्त डिझाइनसाठी आहे किंवा शाई लवकर सुकण्यासाठी. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, हे छोटं छिद्र केवळ डिझाइन नाही, तर ते प्राण वाचवण्यासाठी दिलेलं असतं. पेनच्या टोपणामागचं हे 'सुरक्षा' रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत.
कदाचित तुम्हाला वाटलं असेल की हे फक्त डिझाइनसाठी आहे किंवा शाई लवकर सुकण्यासाठी. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, हे छोटं छिद्र केवळ डिझाइन नाही, तर ते प्राण वाचवण्यासाठी दिलेलं असतं. पेनच्या टोपणामागचं हे 'सुरक्षा' रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
3/7
पेनच्या टोपणाला छिद्र का असतं?लहानपणापासून आपण पेन वापरतोय, पण त्या टोपणाच्या छिद्रामागे इतका मोठा विचार केला असेल असं आपल्याला कधीच वाटलं नाही. याची प्रमुख 3 कारणं खालीलप्रमाणे आहेत.

4/7
1. जीव वाचवण्यासाठी (Safety Feature)हे या छिद्रामागचं सर्वात महत्त्वाचं आणि संवेदनशील कारण आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये पेनचं टोपण तोंडात घालण्याची सवय असते. खेळता खेळता जर एखाद्या मुलाने हे टोपण गिळलं, तर ते त्याच्या श्वासनलिकेत अडकण्याची भीती असते. जर टोपण पूर्णपणे बंद असेल, तर हवा जाण्याचा मार्ग बंद होऊन गुदमरून मृत्यू ओढवू शकतो. पण, टोपणाला छिद्र असल्यास, ते श्वासनलिकेत अडकलं तरी त्या छिद्रातून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू राहतो. यामुळे डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत मुलाचा जीव वाचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

5/7
2. हवेचा दाब संतुलित राखण्यासाठी (Air Pressure Control)पेनचं टोपण लावताना किंवा काढताना कधीकधी ते खूप घट्ट बसतं. जर टोपणाला छिद्र नसेल, तर आतमध्ये 'व्हॅक्यूम' (Vacuum) तयार होऊ शकतं. यामुळे टोपण उघडणं कठीण होतं किंवा अचानक जोरात उघडल्यामुळे शाई बाहेर उडू शकते. टोपणाच्या छिद्रामुळे आतला आणि बाहेरचा हवेचा दाब समान राहतो, ज्यामुळे टोपण सहजपणे उघडता आणि लावता येतं.
2. हवेचा दाब संतुलित राखण्यासाठी (Air Pressure Control) पेनचं टोपण लावताना किंवा काढताना कधीकधी ते खूप घट्ट बसतं. जर टोपणाला छिद्र नसेल, तर आतमध्ये 'व्हॅक्यूम' (Vacuum) तयार होऊ शकतं. यामुळे टोपण उघडणं कठीण होतं किंवा अचानक जोरात उघडल्यामुळे शाई बाहेर उडू शकते. टोपणाच्या छिद्रामुळे आतला आणि बाहेरचा हवेचा दाब समान राहतो, ज्यामुळे टोपण सहजपणे उघडता आणि लावता येतं.
advertisement
6/7
3. शाई गळती आणि सुकण्यापासून बचावअसं म्हटलं जातं की, पेनच्या टोपणातील हे छिद्र शाईच्या प्रवाहावरही नियंत्रण ठेवतं. जेव्हा वातावरणातील तापमानात किंवा हवेच्या दाबात बदल होतो (उदा. विमानात प्रवास करताना), तेव्हा हे छिद्र पेनमधील हवेचा दाब संतुलित ठेवून शाई बाहेर गळण्यापासून (Leakage) वाचवतं. तसेच, यामुळे टोपण बंद असतानाही पेनच्या आत हवा खेळती राहते, जी लेखनासाठी उपयुक्त ठरते.

7/7
ज्या गोष्टीकडे आपण आजवर दुर्लक्ष केलं, ते खरं तर इंजिनिअरिंग आणि सुरक्षिततेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. एका छोट्या छिद्राने मुलांचे प्राण वाचू शकतात, हे वाचल्यावर आता जेव्हा तुम्ही पेन हातात घ्याल, तेव्हा त्या टोपणाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदललेला असेल.

अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement