advertisement

Hair Growth : केसांच्या वाढीसाठी हेअर सीरम घरी कसं बनवायचं ? केसांनी सीरम लावताना काय काळजी घ्यायची ?

Last Updated:

वाढतं प्रदूषण आणि रसायन-आधारित केसांच्या उत्पादनांचा वारंवार वापर यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं. केसांची चांगली वाढ होण्यासाठी घरी एक सीरम बनवता येईल.

News18
News18
मुंबई : आजी आजोबांच्या काळात आहार सकस असायचा. त्यामुळे प्रकृती चांगली राहायची. केसांना नियमितपणे तेल लावलं जायचं. केसांची काळजी नीट घेतली जायची पण आता चित्र बदलतंय.
आजकाल जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमधे मोठे बदल झालेत. ज्यामुळे त्याचा केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाढतं प्रदूषण आणि रसायन-आधारित केसांच्या उत्पादनांचा वारंवार वापर यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं. केस घनदाट, लांबसडक होण्यासाठी तुम्ही उपाय शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी.
advertisement
केसांची चांगली वाढ होण्यासाठी घरी एक सीरम बनवता येईल. Hair growth serum मुळे, केसांची चांगली वाढ होईलच तसंच केस काळे आणि दाट होतील. हे सीरम बनवण्यासाठी, जास्वदांची तीन - चार फुलं, जास्वंदाची  चार - पाच पानं आणि एक चमचा मेथीचे दाणे आवश्यक आहेत.
जास्वंदीची पानं, फुलं घटक रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी पाण्यातून काढून बाजूला ठेवा. झोपण्यापूर्वी हे पाणी केसांच्या मुळांना लावा आणि दुसऱ्या दिवशी केस धुवा. या नैसर्गिक सीरमुळे, केसांची वाढ चांगली होईल, केसांचा रंग सुधारेल आणि केस मजबूत होतील.
advertisement
जास्वदांच्या फुलांमधे अमिनो आम्ल आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. यामुळे टाळूमधे रक्ताभिसरण वाढतं आणि केराटिन उत्पादनाला मदत होतं. त्यांच्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म देखील आहेत.
मेथीच्या बियांमधे प्रथिनं आणि निकोटिनिक आम्ल असतं, यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि नवीन केसांच्या वाढीला प्रोत्साहन मिळतं. याव्यतिरिक्त, यातल्या गुणधर्मांमुळे टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Growth : केसांच्या वाढीसाठी हेअर सीरम घरी कसं बनवायचं ? केसांनी सीरम लावताना काय काळजी घ्यायची ?
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement