Grammar : ‘श’, ‘ष’, ‘स’ मराठीत 3 अक्षर पण इंग्रजीत फक्त 'S' एकच अक्षर का? काय आहे भाषेचा फंडा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जेव्हा मराठी शब्दांना इंग्रजीत लिहायची वेळ येते, तेव्हा आपली मोठी पंचायत होते. अनेकदा कोणत्या शब्दांसाठी काय स्पेलिंग लिहायची यासाठीच लोक गोंधळतात.
मराठी भाषेचं वैभव हे तिच्या व्याकरणात आणि शुद्ध उच्चारात दडलं आहे. आपण जेव्हा शाळा-कॉलेजमध्ये होतो, तेव्हा शुद्धलेखनाच्या तासाला 'शहामृगाचा श', 'षटकोनाचा ष' आणि 'समईचा स' यातील फरक शिक्षकांनी आपल्याला ओरडून ओरडून सांगितला असेल. त्यामुळे आता आपण यात गल्लत करत नाही, पण जेव्हा या शब्दांना इंग्रजीत लिहायची वेळ येते, तेव्हा मात्र आपली मोठी पंचायत होते.
advertisement
advertisement
मराठी किंवा संस्कृत या भाषा 'उच्चारप्रधान' आहेत, म्हणजे जसं बोललं जातं तसंच लिहिलं जातं. याउलट इंग्रजी ही भाषा उच्चारांच्या बाबतीत थोडी मर्यादित आहे. 'श', 'ष' आणि 'स' हे तिन्ही वर्ण इंग्रजीत कसे बदलतात, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या उच्चाराच्या जागेवर (Place of Articulation) लक्ष द्यावं लागेल.
advertisement
advertisement
2. 'श' (Palatal SH): टाळूचा वापरजेव्हा आपण 'श' म्हणतो, तेव्हा जिभेचा मधला भाग टाळूच्या जवळ जातो. याला 'तालव्य' वर्ण म्हणतात. इंग्रजी वर्णमालेत फक्त एका अक्षराने हा उच्चार व्यक्त करता येत नाही. त्यासाठी 'SH' या दोन अक्षरांची जोडणी करावी लागते.उदाहरण: 'शहामृग' किंवा 'शंतनू' (Shantanu). इथे 'S' ला 'H' जोडल्याशिवाय तो विशिष्ट Hissing sound तयार होत नाही.
advertisement
मग सगळेच 'S' का होतात?-इंग्रजीची रोमन लिपी फक्त 26 अक्षरांची आहे, तर मराठीत 36 व्यंजने आहेत. मराठीतील उच्चारांची विविधता इंग्रजी अक्षरांमध्ये बसवणं कठीण जातं.-आंतरराष्ट्रीय मानकांनुसार (IAST), 'स' साठी s, 'श' साठी ś आणि 'ष' साठी ṣ अशी चिन्हे वापरली जातात. पण सामान्य कीबोर्डवर ही चिन्हे नसल्यामुळे आपण सरसकट S किंवा SH वापरतो.-ऐतिहासिक प्रभाव: जुन्या काळात जेव्हा टायपिंग मशीन किंवा टेलिग्राफ आले, तेव्हा मर्यादित अक्षरांमुळे नावातील सूक्ष्म फरक गाळले गेले आणि 'स, श, ष' चं रूपांतर केवळ 'S' मध्ये झालं.
advertisement
भाषेचं शास्त्र सांगतं की, इंग्रजी ही मराठीसारखी समृद्ध भाषा नाही. मराठीत शब्दाच्या उच्चारावरून त्याचे व्याकरण ठरते, तर इंग्रजीत शब्दाच्या स्पेलिंगवरून उच्चार ठरवावे लागतात. म्हणूनच 'श', 'ष', 'स' हे तिन्ही आपल्याकडे स्वतंत्र असले तरी, इंग्रजीच्या दरबारात त्यांना 'S' च्याच रांगेत उभं राहावं लागतं.









