advertisement

Vishal Bharadwaj News: “मला माहिती नव्हतं हे गाणं...”, अरिजीत सिंगच्या निवृत्तीवर विशाल भारद्वाजची इमोशनल पोस्ट; म्हणाला…

Last Updated:

म्युझिक कम्पोजर आणि प्लेबॅक सिंगर विशाल भारद्वाज याने गायक अरिजित सिंग याला पुन्हा गायन क्षेत्रात परतण्याची विनंती इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

News18
News18
27 जानेवारी रोजी गायक अरिजित सिंगने पार्श्वगायन सोडत असल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली होती. अरिजितने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठा चर्चेचा विषय निर्माण झाला होता. गायकाच्या या निर्णयाचा अनेकांना धक्का बसला असून काहींनी गायकाच्या निर्णयाला समर्थन दिलं आहे. सोशल मीडियावर चाहत्यांसह अनेक सिंगर सुद्धा या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. आता अशातच म्युझिक कम्पोजर आणि प्लेबॅक सिंगर विशाल भारद्वाज याने गायक अरिजित सिंग याला पुन्हा गायन क्षेत्रात परतण्याची विनंती केली आहे. विशालने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केलेली आहे.
विशाल भारद्वाजने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केली आहे. त्या व्हिडिओमध्ये विशाल एका ठिकाणी गाणं गाताना दिसत आहे. विशाल आपल्या आवाजामध्ये 'डर लगता है मुझको तू जाने वाला है, मुझे इश्क हुआ है, ये होने वाला है.' आणि व्हिडिओ विशालने अरिजितला टॅग केली आहे. विशालने शेअर केलेली ही व्हिडिओ अरिजितने शूट केलेली असल्याचे त्याने सांगितले आहे. विशालने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, "अरिजीत... काही दिवसांपूर्वी आपण एक गाणं गात होतो आणि तूच तो व्हिडिओ शूट केला आहे. तेव्हा मला माहित नव्हतं की, हे तुझ्यासोबतचं माझं शेवटचं गाणं असेल म्हणून, पण हे unacceptable आहे." विशाल भारद्वाजसोबत त्यांची पत्नी आणि गायिका रेखा भारद्वाज देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
advertisement
अरिजीत सिंगने विशाल भारद्वाजसोबत त्याने दिग्दर्शित केलेला आणि कथा लिहिलेल्या 'ओ रोमियो'साठी एकत्र काम केले आहे. 'ओ रोमियो' चित्रपटातील "हम तो तेरे लिए थे" हे गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आणि त्याला प्रेक्षकांकडून दमदार चांगला प्रतिसाद मिळाला होता. 'ओ रोमियो' या ॲक्शन चित्रपटात शाहिद कपूरसह तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, मंगळवारी, 27 जानेवारी रोजी अरिजीतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने निवृत्तीची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “हॅलो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मागील अनेक वर्षांत मला दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. मला सांगताना आनंद होत आहे की आता मी पार्श्वगायक म्हणून कोणतीही नवीन कामं स्वीकारणार नाही. मी हा प्रवास संपवत आहे. हा एक अद्भुत प्रवास होता.”
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Vishal Bharadwaj News: “मला माहिती नव्हतं हे गाणं...”, अरिजीत सिंगच्या निवृत्तीवर विशाल भारद्वाजची इमोशनल पोस्ट; म्हणाला…
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement