VIDEO : मानलं पोरीला! मुंबईच्या खेळाडूने घेतला खतरनाक कॅच, VIDEO पाहून अंगावर काटा येईल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबईच्या एका खेळाडूने खतरनाक कॅच घेतली आहे. खरं तर हा कॅच खूपच कठीण होता. पण मुंबईच्या या खेळाडूने ही जबरदस्त कॅच घेतली आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Mumbai Indians vs Gujarat Gaints : वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू फायनलला पोहोचली आहे. तर आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंटस यांच्यात सुरू असलेल्या सामन्यातून जिंकणारा संघ हा पहिला एलिमिनेटर ठरणार आहे.त्यामुळे या सामन्याचे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच आता तिकडे मुंबईच्या एका खेळाडूने खतरनाक कॅच घेतली आहे. खरं तर हा कॅच खूपच कठीण होता. पण मुंबईच्या या खेळाडूने ही जबरदस्त कॅच घेतली आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
खरं तर मुंबईकडून तिसरी ओव्हर टाकायला शबमन ईस्माईल आली होती. यावेळी शबनम ईस्माईलच्या दुसऱ्याच बॉलवर बेथ मुनीने बॉल मारला होता. हा बॉल मुंबईच्या संजीवन संजनापासून खूप दूर होता. पण संजीवन संजनाने मैदानात डाईव्ह मारून खतरनाक कॅच घेतला होता. हा कॅच पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चूकला होता.
#ICYMI Sajeevan Sajana took an excellent catch to dismiss Beth Mooney #WPL2026 pic.twitter.com/LbJcMKfLLJ
— Cricbuzz (@cricbuzz) January 30, 2026
advertisement
दरम्यान संजनाच्या या कॅचमुळे बेथ मुनी अवघ्या 8 धावांवर बाद झाली होती. सोफी डिवाईन 25 आणि अनुष्का शर्माने 33 धावा करून गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. यासोबत अॅशले गार्डनरने 28 बॉलमध्ये 46 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना 167 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता मुंबईला सामना जिंकण्यासाठी 168 धावांची आवश्यकता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 9:01 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : मानलं पोरीला! मुंबईच्या खेळाडूने घेतला खतरनाक कॅच, VIDEO पाहून अंगावर काटा येईल









