advertisement

Dhurandhar 2 ची तिकीट मिळाली नाही? मग OTT वर बघा या 7 बेस्ट क्राइम थ्रिलर, क्लायमॅक्स पाहून पायाखालची जमीन सरकेल

Last Updated:
OTT Best Crime Thrillers: तुम्हालाही वीकेंडला काय पाहायचं हा प्रश्न पडला आहे का? तर तुमचा शोध आता संपणार आहे. आज आपण अशा काही वेब सीरिजबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना तगडी रेटिंग मिळाली असून कित्येक महिन्यांपासून त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
1/12
वीकेंड शुक्रवार येताच अनेकांना वीकेंडचे वेध लागतात. तुम्हालाही वीकेंडला काय पाहायचं हा प्रश्न पडला आहे का? तर तुमचा शोध आता संपणार आहे. आज आपण अशा काही वेब सीरिजबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना तगडी रेटिंग मिळाली असून कित्येक महिन्यांपासून त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

2/12
पहिली सीरिज आहे 'सुझल: द वॉर्टेक्स'. ही तमिळ भाषेतील सर्वोत्कृष्ट क्राइम थ्रिलर सीरिज मानली जाते. दक्षिण भारतातील एका गावात १० दिवस चालणाऱ्या एका उत्सवात ही कथा पुढे सरकते. याच दरम्यान, एक किशोरवयीन मुलगी अचानक गायब होते. तपास सुरू होताच गावातील अनेक लपलेली रहस्य समोर येतात.

3/12
परंपरा आणि आधुनिक अपराध याचं अप्रतिम चित्रण करत ही सीरिज क्षणाक्षणाला प्रेक्षकांना धक्के देते. या सीरिजमध्ये ऐश्वर्या राजेश, श्रिया रेड्डी आणि काथिर मुख्य भूमिकेत दिसतात. आईएमडीबीवर या सीरिजला ८.१ रेटिंग मिळालं असून ही दमदार सीरिज तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.

4/12
पाताल लोक ही सीरिज समाजातील भयानक सत्याला अतिशय प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडते. एक साधारण पोलिस अधिकाऱ्याला एका नामांकित पत्रकारावरील हल्ल्याचा तपास करण्याची जबाबदारी दिली जाते. यानंतर या कथेत अशा गोष्टी घडतात की कोणालाही शॉक बसेल.

5/12
समाजातील श्रीमंती, सामान्य जनता आणि अपराध यांना वास्तविक रुपात प्रेक्षकांसमोर मांडण्यात आलं असून अभिनेता जयदीप अहलावतचा अभिनय पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरतं. अॅमेझॉन प्राइमवर तुम्ही ही सीरिज पाहू शकता. विशेष म्हणजे, ही सीरिज जयदीप अहलावतच्या करिअरमधील मोठा टर्निंग पॉईंट ठरली.

6/12
कोहरा ही पंजाबमधील पार्श्वभूमीवर आधारित एक गूढ मर्डर मिस्ट्री आहे. लग्नाच्या काही वेळाआधीच एनआरआय नवरदेवाची हत्या होते, यानंतर दोन पोलिस अधिकारी तपासात अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा करतात. बरेच जुने रहस्य समोर येतात. बरुण सोबती आणि सुविंदर विक्की यांनी या सीरिजमध्ये दमदार काम केलं आहे. तुम्ही नेटफ्लिक्सवर ही सीरिज कधीही पाहू शकता.

7/12
नेटफ्लिक्सची सर्वात गाजलेली सीरिज म्हणजे सेक्रेड गेम्स. या तुफान गाजलेल्या सीरिजमध्ये सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाली. एका इमानदार पोलिस अधिकाऱ्याला कुख्यात गँगस्टरचा फोन येतो, जो शहराला असलेल्या धोक्याची सूचना देतो. यानंतर या कथेत अपराध, राजकारण आणि धर्म यांचा मेळ पाहायला मिळतो.

8/12
बंबई मेरी जान: १९६० च्या दशकातील मुंबईवर आधारित ही कथा एका इमानदार पोलिस अधिकारी आणि त्याच्या मुलामधील मतभेद आणि त्यांच्यातील संघर्ष दाखवते. पोलिसाचा मुलगा वडिलांचा वारसा सोडून अपराधाच्या दुनियेत पाऊल ठेवतो.

9/12
कुटुंब आणि महत्त्वाकांक्षा यांच्यातील संघर्ष या सीरिजमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. केके मेनन आणि अविनाश तिवारी यांच्या जबरदस्त अभिनयाने सजलेली ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

10/12
तब्बर : या सीरिजमध्ये अशा एका कुटुंबाची गोष्ट दाखवण्यात आली आहे, ज्यात त्यांची एक चूक सर्वकाही उद्ध्वस्त करते. एक निवृत्त पोलिस अधिकारी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी सर्वकाही करतो. अशातच तो नकळत एक हत्या करतो. कुटुंब आणि नात्यांमधील ताकद ही सीरिज अत्यंत जवळून दाखवते. पवन मल्होत्रा यांचा अभिनय अतिशय प्रभावी असून ही सीरिज सोनी लिव्हवर तुम्ही पाहू शकता.

11/12
मानवत हत्याकांड: सत्य घटनांवर आधारित ही सीरिज १९७० च्या दशकात महाराष्ट्रात घडलेल्या हत्यांच्या मालिकेची कथा सांगते. अंधश्रद्धा आणि लोभामुळे एका गावात सतत गुन्हे घडत राहतात. एक अनुभवी तपास अधिकारी आपल्या पारंपरिक पद्धती वापरून प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतो.

12/12
या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी अशी एकापेक्षा एक सरस कलाकारमंडळी तुम्हाला पाहायला मिळतील. ही सीरिज सोनीलिव्हवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement