Nanded News : घरात पैसा नाही आणि खायला माणसं जास्त, पित्याने वैतागून पोटच्या पोरीलाच संपवलं, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका पित्यानेच आपल्या पोटच्या पोरीची हत्या केल्याची घटना घडली आहे. प्राची असे या 7 वर्षीय चिमुरडीचे नाव होते.
Nanded Crime : मुजीब शेख, नांदेड : जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका पित्यानेच आपल्या पोटच्या पोरीची हत्या केल्याची घटना घडली आहे. प्राची असे या 7 वर्षीय चिमुरडीचे नाव होते.नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे. दरम्यान या घटनेत पित्याने मुलीची हत्या का केली? हे जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील पांडुरंग कोंडामंगले आपल्या कुटुंबियांसोबत राहायचे. पांडुरंग कोंडामंगले यांना दोन जुळ्या मुली होत्या. दरम्यान 29 जानेवारीच्या रात्री आपली मुलगी प्राचीला घेऊन निघून गेले. या दरम्यान रस्त्यात त्यांना तेलंगणा राज्यातील येडपल्ली येथील
एक कालव लागला. या कालव्यात त्यांनी प्राचीला फेकून तिची हत्या केली. या घटनेनंतर ते घरी निघून आले होते.
advertisement
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी हत्येचा तपास सूरू केला होता. या तपासा दरम्यान पोलीस पांडुरंग यांच्या घरातही पोचले होते. या दरम्यान चौकशीत पोलिसांना पांडुरंग कोंडामंगले यांच्याकडून गुन्हा उकलण्यात यश आले आणि या घटनेचा उलगडा झाला होता. दरम्यान आरोपीने स्वतःच्या मुलीची हत्या का केली याचा तपास सुरू आहे. पण सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार आरोपी आर्थिक विवंचनेत होता अशी माहिती आहे. एकंदरीत घरात पैसा नाही त्यात खायला माणस जास्त त्यामुळे पांडुरंग यांनी आपल्या मुलींची हत्या केल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
advertisement
या घटनेचा उलगडा होताच तेलंगणा पोलिसांनी आरोपी पांडुरंग कोंडामंगले याला नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथून ताब्यात घेतले. तसेच या घटनेचा अधिक तपास सूरू केला आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 11:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded News : घरात पैसा नाही आणि खायला माणसं जास्त, पित्याने वैतागून पोटच्या पोरीलाच संपवलं, नेमकं काय घडलं?







