advertisement

Health Care : लॅपटॉपवर सतत काम करता ? या सोप्या व्यायामांनी शरीराचा ताण होईल कमी

Last Updated:

तासन्तास लॅपटॉप किंवा संगणकावर काम केल्यानं मानदुखी, सर्वायकल कॅन्सर आणि पाठदुखीच्या समस्या वाढतायत. यासाठी काही सोपे व्यायाम केल्यानं आराम मिळू शकतो. तज्ज्ञांच्या मते, योग्य आसनं केल्यानं  आणि काही सोपे व्यायाम करून या समस्या बऱ्याच प्रमाणात टाळता येतात.

News18
News18
मुंबई : काहींना नोकरीसाठी कार्यालयात जावं लागतं तर काहींना घरुन काम करता येतं. बहुतांश कामं संगणक किंवा लॅपटॉपवर होत असल्यानं प्रकृतीवर त्याचा ताण येतो. काम करताना बसण्याची पद्धत कशी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे.
तासन्तास लॅपटॉप किंवा संगणकावर काम केल्यानं मानदुखी, सर्वायकल कॅन्सर आणि पाठदुखीच्या समस्या वाढतायत. यासाठी काही सोपे व्यायाम केल्यानं आराम मिळू शकतो. तज्ज्ञांच्या मते, योग्य आसनं केल्यानं  आणि काही सोपे व्यायाम करून या समस्या बऱ्याच प्रमाणात टाळता येतात.
तज्ज्ञांच्या मते, लॅपटॉप वापरणाऱ्यांसाठी स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर असणं आवश्यक आहे. ज्यामुळे मान पुढे वाकणार नाही. आदर्श स्थितीत म्हणजेच तज्ज्ञांच्या मते, ideal position म्हणजे पाठ सरळ असणं, खांदे आरामदायी असणं आणि मानेला आधार असणं आवश्यक आहे.
advertisement
संगणकाची स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर किंवा थोडीशी खाली ठेवा, जेणेकरून तुमचं डोकं वर-खाली वाकवावं लागणार नाही. कीबोर्ड अशा प्रकारे ठेवा की, तुमचं कोपर अंदाजे नव्वद - शंभर अंशांच्या कोनात असतील. कीबोर्ड डेस्कवर थोडा खाली किंवा कोपराच्या पातळीभोवती ठेवल्यानं खांद्यावर आणि मानेवर दबाव कमी होतो.
advertisement
लॅपटॉप वापरणाऱ्यांनी स्टँड वापरणं चांगलं, कारण लॅपटॉप स्क्रीन थोडी खाली असते. ज्यामुळे tech neck syndrome होऊ शकतो. यासाठी मानेचे व्यायाम करणं गरजेचं आहे.
दररोज मानेच्या रेंज-ऑफ-मोशन व्यायामामुळे स्नायू बळकट होतात आणि दीर्घकाळ काम करण्याची क्षमता वाढते. या व्यायामांमधे मान पुढे-मागे करणं, डावीकडे आणि उजवीकडे करणं असे हलके, सौम्य हालचाल करणं फायदेशीर ठरेल.
advertisement
दर अर्धा तास - पाऊण तासांनी ब्रेक घ्या असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. या ब्रेकमधे उठा, फिरा आणि मानेला थोडं स्ट्रेच करा. ज्या खुर्चीवर बसतात ती खुर्ची आधार असणारी असावी आणि पाय जमिनीवर टेकलेले असावेत.
लॅपटॉपवर काम करत असाल तर external कीबोर्ड आणि माउस वापरण्याचा विचार करा. या छोट्या बदलांमुळे, वेदना कमी करण्यात मदत होऊ शकते. नियमित व्यायामामुळे आरोग्य सुधारू शकतं. हे व्यायाम नियमित केल्यानंतरही वेदना तीव्र असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Care : लॅपटॉपवर सतत काम करता ? या सोप्या व्यायामांनी शरीराचा ताण होईल कमी
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement