आधी धनश्री वर्मी, मग आरजे महावश, आता शेफाली बग्गा! व्हायरल AI पोस्टरवर युझवेंद्र चहलने सोडलं मौन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Yuzvendra Chahal Dating Life: कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटानंतर चहलचं नाव कोणासोबत जोडलं जाईल, याचा नेम नाही. कधी आरजे महवश, तर कधी शेफाली बग्गा.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा लाडका फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या क्रिकेटच्या मैदानापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळेच जास्त चर्चेत आहे. कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटानंतर चहलचं नाव कोणासोबत जोडलं जाईल, याचा नेम नाही. कधी आरजे महवश, तर कधी शेफाली बग्गा. सोशल मीडियावर चहलच्या लव्ह लाईफबद्दल इतक्या चर्चा आहेत की, आता थेट एआय जनरेटेड पोस्टर्सचा पाऊस पडू लागला आहे. पण या सगळ्यात खरी बाजी मारली ती स्वतः युझीनेच. त्याच्या एका कमेंटने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
'किस किसको प्यार करू ३' मध्ये युझवेंद्र चहल?
अलीकडेच सोशल मीडियावर कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करू' या चित्रपटासारखेच काही मजेशीर AI पोस्टर्स व्हायरल झाली. ग्राफिक डिझायनर विजय कुमार बारिया याने बनवलेल्या या पोस्टरमध्ये चहल मध्यभागी असून त्याच्या भोवती धनश्री वर्मा, आरजे महवश आणि शेफाली बग्गा दिसत आहेत. हे पोस्टर इतकं व्हायरल झालं की चहलच्या नजरेतही ते पडलं.
advertisement

अनेकांना वाटलं होतं की चहल यावर संतापेल, पण त्याने त्याच्या नेहमीच्या खट्याळ शैलीत कमेंट केली "ॲडमिन, अजून २-३ नावं राहिलीत बरं का! पुढच्या वेळी जरा नीट रिसर्च करून पोस्टर बनव." चहलची ही हजरजबाबी वृत्तीवर फॅन्स फिदा झाले असून "युझीला गुगली टाकता येते तशीच ती खेळताही येते," अशा कमेंट्सचा पूर आला आहे.
advertisement

धनश्रीचे खळबळजनक आरोप आणि चहलचं उत्तर
एकीकडे ही मजा-मस्ती सुरू असली, तरी चहल आणि धनश्रीच्या नात्यातील कटुता आता जगजाहीर झाली आहे. रिअॅलिटी शो 'राईज अँड फॉल'मध्ये धनश्रीने अश्नीर ग्रोव्हरसमोर धक्कादायक खुलासा केला होता. तिने दावा केला की, लग्नाच्या पहिल्या दोन महिन्यांतच चहलने तिला धोका दिला होता. यावर चहलनेही मौन सोडलं आहे. तो म्हणाला, "जर लग्नाच्या सुरुवातीलाच असं काही झालं असतं, तर आमचं नातं साडेचार वर्ष कसं टिकलं असतं?" मार्च २०२५ मध्ये या दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला.
advertisement
शेफाली बग्गासोबतची 'ती' डिनर डेट
दुसरीकडे, मुंबईत चहलला 'बिग बॉस १३' फेम शेफाली बग्गासोबत एका रेस्टॉरंटबाहेर पाहण्यात आलं. याआधी त्याचं नाव आरजे महवशसोबत जोडलं जात होतं, पण दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली. आता शेफालीसोबत चहलच्या नव्या इनिंगची सुरुवात झाली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 11:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी धनश्री वर्मी, मग आरजे महावश, आता शेफाली बग्गा! व्हायरल AI पोस्टरवर युझवेंद्र चहलने सोडलं मौन










