शरद पवार नीरा नदीची पाहणी करताना घडली मोठी घटना, सुरक्षारक्षकांनी Video केला रेकॉर्ड, गावात भीतीचं वातावरण
- Published by:Sachin S
Last Updated:
घरातील दुःखाला मागे सारत ८५ वर्षांचे शरद पवार हे आज बारामतीतील प्रदूषित झालेल्या नीरा नदीची पाहणी केली. यावेळी
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थीचं आज पवार कुटुंबीयांकडून विसर्जन करण्यात आलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीमधील नीरा नदीची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. मागील काही दिवसांपासून शरद पवार हे सक्रीय राजकारणापासून दूर होते. आज शरद पवार पाहणी दौऱ्यावर आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. या भेटीदरम्यान नीरा नदीच्या पात्रात बिबट्या आढळून आल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अजित पवार यांच्या निधन झाल्यामुळे महाराष्ट्रावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पण, घरातील दुःखाला मागे सारत ८५ वर्षांचे शरद पवार हे आज बारामतीतील प्रदूषित झालेल्या नीरा नदीची पाहणी केली. यावेळी शरद पवार नीरा नदीची पाहणी करण्यासाठी आले असताना सुरक्षारक्षकांना बिबट्या दिसला. सुरक्षारक्षकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचा व्हिडीओ कैद केला आहे.
advertisement
शरद पवारांनी तात्काळ या संदर्भात वनविभागाला सूचना केल्या आहे. येथील नागरिकांनी सतर्क राहण्याचा संदर्भात देखील पवार यांनी आवाहन केलं आहे. लहान मुला संदर्भात त्यांना एकटे खेळण्यास सोडू नका, असा सल्लाही पवार यांनी दिला.
शरद पवारांनी गावकऱ्यांना दिलं आश्वासन
दरम्यान, नीरा नदीपासून जे काही पाणी प्रदूषित होतं, त्यामध्ये माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना त्याचप्रमाणे फलटणमधील कत्तलखाना आणि दूध प्रकल्पातील सांडपाण्याचा समावेश आहे. ही सगळी माहिती घेतल्याने मी या ठिकाणी पाहण्यासाठी आलो अर्थात यासंदर्भात सरकारी पातळीवर मी चर्चा करेल, असं आश्वासन शरद पवार यांनी गावकऱ्यांना दिलं.
advertisement
यावेळी ग्रामस्थांनी त्यांना निरा नदीतील पाणी बादलीत भरून आणून दाखवलं. हे पाणी पूर्णतः गढूळ असून हे पाणी अंगाला स्पर्श झाल्यास अंग खाजवतं तसंच मासे देखील या पाण्यात राहिलेले नाहीत आणि शेतातील पिकांना पाणी दिले तर पिकाची वाढ खुंटते अशा स्वरूपाच्या तक्रारी या शेतकऱ्यांनी केल्या, आम्हाला भीती वाटते हे पाणी जास्तीत जास्त विषारी झाले तर आरोग्याला देखील घातक ठरेल, अशी भीती देखील यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 10:16 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
शरद पवार नीरा नदीची पाहणी करताना घडली मोठी घटना, सुरक्षारक्षकांनी Video केला रेकॉर्ड, गावात भीतीचं वातावरण










