advertisement

फक्त एका व्यक्तीमुळे सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी उलथापालथ; भीतीने गुंतवणूकदारांची पळापळ, घसरणीमागे ट्रम्प यांचा हात

Last Updated:

Gold Silver Prices Crash: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांची नियुक्ती होताच जागतिक बाजारात मोठा भूकंप झाला असून, भारतीय बाजारात चांदी 60 हजार तर सोने 13 हजार रुपयांनी कोसळले आहे.

News18
News18
वॉशिंग्टन: ग्लोबल मार्केटमध्ये कधी-कधी एखादं नावच पुरेसं ठरतं… संपूर्ण ट्रेंड उलटवण्यासाठी. यावेळी तेच घडलं. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या पुढील अध्यक्षपदाच्या शर्यतीत केविन वॉर्श (Kevin Warsh) आघाडीवर असल्याच्या बातमीने सोने-चांदीची विक्रमी तेजी एका झटक्यात तुटली. डॉलर मजबूत झाला आणि कमोडिटी मार्केटमध्ये जोरदार विक्रीचा सपाटा सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे की ते फेडरल रिझर्व्ह सिस्टमच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे नवे अध्यक्ष म्हणून केविन वॉर्स यांची नियुक्ती करत आहेत.
भारतीय गुंतवणूकदारांसाठी आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की केविन वॉर्श नेमके कोण आहेत, त्यांची आर्थिक भूमिका काय आहे आणि यानंतर सोने-चांदीचा पुढचा प्रवास कसा असेल?
MCX वर इतिहासातला मोठा झटका
30 जानेवारी 2026 रोजी भारतीय कमोडिटी बाजारात असा धक्का बसला, जो दीर्घकाळ लक्षात राहील. MCX वर सोन्याच्या दरात एका दिवसात जवळपास 13,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी प्रचंड घसरण झाली. तर चांदी तब्बल 60,000 रुपये प्रति किलो कोसळली.
advertisement
परिस्थिती इतकी बिघडली की MCX वर चांदी 15 टक्क्यांनी घसरत 3,51,906 रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचली आणि लोअर सर्किट लागून व्यवहार थांबवावा लागला. म्हणजेच विक्रीचा दबाव इतका होता की ट्रेडिंग सिस्टमलाच ब्रेक लावावा लागला.
सोन्याचंही चित्र वेगळं नव्हतं. Gold सुमारे 6 टक्क्यांनी घसरून 1,59,250 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर लोअर सर्किटमध्ये अडकलं.
advertisement
इंटरनॅशनल मार्केटमध्येही तेच चित्र
देशांतर्गतच नाही तर जागतिक बाजारातही मोठी उलथापालथ झाली. COMEX वर चांदी घसरत 100 डॉलर प्रति औंसच्या खाली आली. काही दिवसांपूर्वीच विक्रमी तेजी दाखवणारी चांदी एका बातमीने इतकी घसरली, हेच बाजारासाठी धक्कादायक ठरलं.
चांदीच्या किमती का घसरल्या? उत्तर एकच
आज “why silver is falling today” या प्रश्नाचं एकच नाव उत्तर देतं – Kevin Warsh. ज्या क्षणी बातमी आली की 2026 मध्ये Jerome Powell यांच्या जागी Donald Trump केविन वॉर्श यांना फेड चेअर म्हणून निवडू शकतात, त्याच क्षणी बाजाराचा मूड बदलला.
advertisement
केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांच्या मते, ट्रंप Kevin Warsh यांना Fed Chair साठी नॉमिनेट करू शकतात, या चर्चेनंतर डॉलरमध्ये तात्काळ मजबुती आली. मजबूत डॉलरचा थेट फटका सोने-चांदीला बसला.
रिकॉर्ड रॅलीनंतर सोन्यात जवळपास 5.9% घसरण झाली, तर चांदी आणि प्लॅटिनममध्ये 10% पेक्षा जास्त मोठी पडझड पाहायला मिळाली. याच आंतरराष्ट्रीय कमकुवतपणाचा परिणाम थेट MCX वरही उमटला आणि देशांतर्गत बाजारात घबराट पसरली.
advertisement
केविन वॉर्शचं नाव बाजाराला का घाबरवतं?
यामागचं मुख्य कारण म्हणजे केविन वॉर्श यांची पॉलिसी विचारसरणी. Kevin Warsh यांना अमेरिकेत “हॉकिश” पॉलिसीमेकर मानलं जातं, म्हणजेच महागाईविरोधात कठोर भूमिका घेणारा नेता. त्यांचं स्पष्ट मत असं राहिलं आहे की महागाईचा दबाव असताना सेंट्रल बँकेनं गरजेपेक्षा जास्त सवलती देऊ नयेत.
जेव्हा फेड कडक धोरणाचा संकेत देतो, तेव्हा व्याजदर जास्त काळ उंच पातळीवर राहण्याची शक्यता वाढते. याचा फायदा डॉलरला होतो. आणि मजबूत डॉलर हा सोने-चांदीसाठी नेहमीच नकारात्मक मानला जातो.
advertisement
म्हणूनच Kevin Warsh यांचं नाव समोर येताच आधी डॉलर मजबूत झाला आणि त्यानंतर बुलियनमध्ये नफेखोरी व भीतीची विक्री सुरू झाली.
तरीही चित्र पूर्णपणे एकतर्फी नाही
एक महत्त्वाची बाब म्हणजे अलीकडच्या काळात Kevin Warsh काही वेळा कमी व्याजदरांच्या समर्थनातही दिसले आहेत. म्हणजेच त्यांची भूमिका पूर्णपणे एका टोकाची नाही. पण तरीसुद्धा बाजार त्यांना अजूनही महागाईविरोधात कठोर भूमिका घेणारा नेता म्हणूनच पाहतो आणि त्यामुळेच प्रतिक्रिया इतकी तीव्र झाली.
advertisement
याशिवाय सोने आणि चांदी आधीच ओव्हरबॉट झोनमध्ये होती. टेक्निकल इंडिकेटर्स खूप स्ट्रेच झाले होते. बाजाराला फक्त एका ट्रिगरची गरज होती… आणि Kevin Warsh यांचं नाव तो ट्रिगर ठरलं.
Kevin Warsh कोण आहेत?
Kevin Warsh यांचा जन्म 1970 मध्ये न्यूयॉर्कमधील Albany येथे झाला. त्यांनी Stanford University मधून Public Policy मध्ये शिक्षण घेतलं आणि Harvard Law School मधून कायद्याची पदवी मिळवली.
1995 ते 2002 दरम्यान त्यांनी Morgan Stanley मध्ये M&A डिव्हिजनमध्ये Executive Director म्हणून काम केलं. त्यानंतर 2002 ते 2006 या काळात George W. Bush यांच्या व्हाइट हाऊसमध्ये National Economic Council चे सचिव होते.
2006 मध्ये अवघ्या 35व्या वर्षी, त्यांची फेडरल रिझर्व्ह बोर्डाचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. ते 2011 पर्यंत या पदावर होते.
2008 च्या ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसमध्ये Kevin Warsh यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. फेड आणि वॉल स्ट्रीट यांच्यातील मुख्य दुवा म्हणून त्यांनी काम केलं. Bear Stearns–JP Morgan डीलमध्ये ते प्रमुख नेगोशिएटर होते. G20 बैठकींमध्येही त्यांनी अमेरिकेचं प्रतिनिधित्व केलं.
सध्या Kevin Warsh Stanford University मध्ये Hoover Fellow आहेत. तसेच दिग्गज गुंतवणूकदार Stan Druckenmiller यांच्या Duquesne Family Office मध्ये पार्टनर आहेत. UPS आणि Coupang च्या बोर्डवरही ते सदस्य आहेत.
पुढे सोने-चांदीचं काय?
कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, शॉर्ट टर्ममध्ये सोने आणि चांदीमध्ये मोठी अस्थिरता राहू शकते. Kevin Warsh यांच्या नियुक्तीमुळे डॉलर मजबूत राहिल आणि बुलियनवर दबाव कायम राहू शकतो.
मात्र सध्याची घसरण ही पूर्णपणे ट्रेंड बदलणारी आहे, असं ठामपणे म्हणता येणार नाही. जागतिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि ग्रोथबाबतची भीती कायम राहिली, तर प्रत्येक मोठ्या घसरणीत पुन्हा खरेदीची मागणी वाढू शकते. सध्या तरी Kevin Warsh यांच्या नावानं बाजाराला मोठा धक्का दिला आहे हे मात्र निश्चित.
view comments
मराठी बातम्या/मनी/
फक्त एका व्यक्तीमुळे सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी उलथापालथ; भीतीने गुंतवणूकदारांची पळापळ, घसरणीमागे ट्रम्प यांचा हात
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement