सुनेत्रा पवार राज्यसभेचा राजीनामा देणार, पार्थ पवार खासदार होणार! पक्षांतर्गत हालचालींना सुरुवात
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा आणि विधान परिषद आमदारांची बैठक उद्या शनिवारी मुंबईत होत आहे.
बारामती : अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रिपदाची जागा घेण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्यासाठी पक्षातील लोक आग्रही असताना त्यांनीही होकार दिल्याचे समजते. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे, राजभवनात त्याची तयारीही सुरू आहे. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्याजागी त्यांचे पुत्र पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा आणि विधान परिषद आमदारांची बैठक उद्या शनिवारी मुंबईत होत आहे. या बैठकीत विधिमंडळ नेता निवडीची औपचारिकता पूर्ण होऊन सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. नंतर काही दिवसांनी त्या राज्यसभेचा राजीनामा देऊन विधिमंडळाचे सदस्यत्व प्राप्त करतील.
पवार कुटुंबातील सदस्यांची बारामतीत बैठक
बारामतीतील घरी पवार कुटुंबातील सदस्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील, यावर शिक्कामोर्तब झाले. तर राज्यसभेत पार्थ पवार प्रतिनिधित्व करतील, असेही ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीतील महत्त्वाचे नेतेही सुनेत्रा पवार यांच्याशी बोलल्याचे सांगण्यात येते.
advertisement
पार्थ पवार लोकसभेला पराभूत, पक्षात सक्रीय, आता राज्यसभेवर वर्णी लागणार
अजित पवार यांच्या हयातीतच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राजकीय नशीब आजमावले होते. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी २०१९ ला लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग आप्पा बारणे यांनी जवळपास सव्वा लाखाने त्यांचा पराभव झाला. पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी पक्षातील कामकाज सुरू ठेवले. पक्षाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे, बैठकांचे नियोजन करणे आदी कामात ते सहभागी होत असे.
advertisement
पक्षातील सहकाऱ्यांशी जुळवून घेऊन त्यांना एकसंध ठेवण्याचे मायलेकरांसमोर मोठे आव्हान
पक्षसंघटनेत फारसा अनुभव नसेल परंतु संसदीय राजकारणाला सुरुवात केल्यानंतर हळूहळू डावपेच शिकून घेण्यास पार्थ पवार प्राधान्य देतील. अजित पवार यांच्या माघारीनंतर पक्षातील सहकाऱ्यांशी जुळवून घेऊन त्यांना एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासमोर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 10:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुनेत्रा पवार राज्यसभेचा राजीनामा देणार, पार्थ पवार खासदार होणार! पक्षांतर्गत हालचालींना सुरुवात










