advertisement

अजितदादांनी जिथे लढाई अर्ध्यावर सोडली तिथून शरद पवारांची 40 वर्षांनी सुरुवात;योगायोग की राजकीय संकेत, कनेक्शन समोर

Last Updated:

शरद पवारांनी बारामतीची जबाबादारी 40 वर्षापूर्वी अजित पवारांवर सोपवलेली मात्र आता दादांच्या निधनानंतर शरद पवार पुन्हा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय.

Shatrad pawar
Shatrad pawar
पुणे : अजित पवारांचं अस्थीविसर्जन झाल्यानंतर लगेचच शरद पवार पुन्हा कामाला लागलेत. शरद पवारांनी वागज येथे नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली. नीरा नदी प्रदूषणासंदर्भात तक्रारी आल्याने पवार पाहणीसाठी पोहोचल आणि त्यांनी स्थानिकांशी चर्चा केली आहे. शरद पवारांनी बारामतीची जबाबादारी अजित पवारांवर सोपवलेली मात्र आता दादांच्या निधनानंतर शरद पवार पुन्हा मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. मात्र शरद पवारांनी पाहणी आज या गावाची निवड करण्यामागे अजित पवारांचे कनेक्शन समोर आहे.
28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं निधन झालं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार विमानाने चालले होते. बारामतीत नीरा वागज, करंजे पूल, पणदरे आणि सुपे अशा चार ठिकाणी सभा होणार होत्या. मात्र सभेला जाण्यापूर्वीच झालेल्या विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

40  वर्षानंतर शरद पवार पुन्हा बारामतीत सक्रिय

advertisement
अनेक वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवला होता आणि स्वतः देशाच्या राजकारणात लक्ष घातलं होतं. तेव्हापासून अजित पवार बारामतीच्या समस्यांचे निराकरण करायचे. मात्र, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामतीची सूत्रे स्वतः शरद पवारांनी हाती घ्यायचं ठरवल्याचं दिसतंय. तब्बल 40  वर्षानंतर शरद पवारांनी पुन्हा बारामतीत सक्रिय होण्यासाठी अजित पवारांची शेवटची सभा जिथे होणार होती, त्या गावापासून सुरुवात केली.
advertisement

निव्वळ योगायोग की आणखी काय?

अजित पवारांची सभा जिथे झाले नाही ती अर्धवट राहिली आणि त्याच गावात पाहणी दौरा सुरू करून ४० वर्षानंतर शरद पवार पुन्हा सक्रिय होणे हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काय अशा चर्चांना उधाण आले आहे. जिथे अजित पवारांनी लढाई अर्ध्यावर सोडली तिथूनच शरद पवारांनी संघर्षाची लढाई पुन्हा सुरू करत  पुन्हा सक्रिय होत त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिल्याचे म्हटले आहे.
advertisement

नेमकं बारामतीत काय घडलं?

अजित पवार यांचं निधन होऊन फार दिवसही उलटले नाही आणि शरद पवार स्वतःवर आलेलं संकट आणि दुःख बाजूला ठेऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होताना दिसले. कालच अजित पवार यांच्यावर अंत्यसंकार पार पडले. आज दुपारी पार्थ आणि जय पवार यांनी अस्थीविसर्जन केलं. मात्र त्यानंतर तासाभरातच शरद पवार नीरा नदीच्या काठावर पोहोचले. नीरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. यां मुळे शेजाच्या गावांना मोठा फटका बसतो. आजबाजूचे कारखाने आणि कत्तल खाण्यातील घाण ही नीरा नदीत सोडली जाते ज्याने पाण्यात मोठ्याप्रमाणात प्रदूषण पाहायला मिळतंय. शरद पवार यांनी आज काही शेतकऱ्यांशी आणि स्थानिक नेत्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या व लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांनी जिथे लढाई अर्ध्यावर सोडली तिथून शरद पवारांची 40 वर्षांनी सुरुवात;योगायोग की राजकीय संकेत, कनेक्शन समोर
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement