Heart Repair : आपल्या हृदयात आहे स्वतःला बरं करण्याची क्षमता, संशोधकाच्या अभ्यासातून महत्त्वाचा खुलासा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उंदरांचं हृदय दुखापतीनंतर हृदयाचे स्नायू दुरुस्त करतं असं या संशोधनातून आढळून आलं होतं. पण, आतापर्यंत मनुष्यांमधे ही शक्ती नाही असं मत होतं. मानवी शरीरातही ही उल्लेखनीय क्षमता आहे. हा शोध भविष्यातील हृदय उपचारांमधे लक्षणीय बदल घडवून आणू शकतो. सिडनी विद्यापीठाच्या नवीन संशोधनातून हे पहिल्यांदाच सिद्ध झालं.
मुंबई : हृदय म्हणजे अविरत काम करणारा महत्त्वाचा अवयव. सिडनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मानवी हृदयाबद्दल संशोधन केलं. त्यांच्या मते, हृदयात स्वतःला बरं करण्याची क्षमता आहे.
हृदयविकाराच्या झटक्यानंतर आपल्या हृदयात नवीन स्नायू पेशी तयार होतात, म्हणजेच हृदय काही प्रमाणात स्वतःला दुरुस्त करू शकतं असं या संशोधनात दिसून आलं आहे.
सिडनी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात एक अभ्यास केला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर आपल्या हृदयात नवीन स्नायू पेशी तयार होतात, म्हणजेच हृदय काही प्रमाणात स्वतःला दुरुस्त करू शकतं असं संशोधनातून दिसून आलं.
advertisement
हृदयविकाराच्या झटक्यानंतर प्रत्यक्षात काय होतं ?
हृदयाला रक्तपुरवठा बंद पडतो तेव्हा अटॅक येतो. रक्ताच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनचा अभाव होतो आणि हृदयाच्या पेशी मरण्यास सुरुवात होते. आतापर्यंत आपल्याला माहित आहे की या नुकसानाची भरपाई करण्यासाठी, आपलं शरीर scar tissue म्हणजेच काही ऊती तयार करतं.
scar tissue सामान्य हृदयाच्या स्नायूंप्रमाणे कार्य करत नाही. यामुळे हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा दुसरा झटका येण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. हृदयात नवीन स्नायू पेशींची निर्मिती होते असं या संशोधनातून समोर आलं आहे. म्हणजेच मानवी शरीरात देखील recovery करण्याची क्षमता आहे.
advertisement
उंदरांसारख्या काही प्राण्यांमधे ही क्षमता असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं होतं. उंदरांचं हृदय दुखापतीनंतर हृदयाचे स्नायू दुरुस्त करतं असं या संशोधनातून आढळून आलं होतं. पण, आतापर्यंत मनुष्यांमधे ही शक्ती नाही असं मत होतं. मानवी शरीरातही ही उल्लेखनीय क्षमता आहे. हा शोध भविष्यातील हृदय उपचारांमधे लक्षणीय बदल घडवून आणू शकतो. सिडनी विद्यापीठाच्या नवीन संशोधनातून हे पहिल्यांदाच सिद्ध झालं.
advertisement
हृदय शस्त्रक्रियेनंतर शरीरात काय होतं यासाठी रुग्णांचं निरीक्षण करणात आलं होतं. या संशोधनात दुखापतीनंतर हृदयाच्या स्नायूंच्या पेशी पुन्हा निर्माण होण्याची क्षमता असल्याचे संकेत मिळाले आहेत.
या नवीन अभ्यासात, संशोधक ह्यूम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेंदू मृत म्हणजेच brain dead घोषित केलेल्या दात्याच्या म्हणजेच donorच्या हृदयातील जिवंत मानवी हृदयाच्या ऊतींचं तसेच बायपास सर्जरी दरम्यान रुग्णांकडून गोळा केलेल्या नमुन्यांची तपासणी केली.
advertisement
या निष्कर्षांमुळे new regenerative therapies म्हणजेच नवीन पुनरुत्पादक उपचारपद्धती निर्माण होऊ शकतात अशी आशा आहे. जगभरात हृदयविकारामुळे लाखोंचा जीव जातो. पण या नवीन संशोधनामुळे, येणाऱ्या काळात आपल्याला हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करता येऊ शकेल का याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 5:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Repair : आपल्या हृदयात आहे स्वतःला बरं करण्याची क्षमता, संशोधकाच्या अभ्यासातून महत्त्वाचा खुलासा










