Bigg Boss Marathi 6: 'तुम्ही लाडात आले आहात...', 'भाऊच्या धक्का'वर रितेश भाऊने प्रभू शेळकेची घेतली शाळा; सुनावले खडेबोल
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
'भाऊच्या धक्क्या'वर रितेश देशमुख घरातल्या स्पर्धकांना चांगलेच खडेबोल सुनावताना दिसणार आहे. राकेश बापट आणि दिव्या शिंदे यांना खडेबोल सुनावल्या नंतर आता रितेश भाऊ प्रभू शेळकेची शाळा घेताना दिसत आहे.
बिग बॉस मराठी सिझन 6 ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ स्पर्धकांना चांगलेच खडेबोल सुनावताना दिसणार आहे. राकेश बापट आणि दिव्या शिंदे यांना खडेबोल सुनावल्या नंतर आता रितेश भाऊ प्रभू शेळकेची शाळा घेताना दिसत आहे. जेमतेम 20 वर्षांचा असलेल्या प्रभू शेळकेला त्याच्या बोलण्यावरून खडेबोल सुनावले जाणार आहे. मुर्ती लहान पण किर्ती महान या म्हणी प्रमाणे असलेल्या प्रभूला सर्वत्र ठिकाणाहून टिकेचे धनी केले गेले आहे.
काही तासांपूर्वीच कलर्स मराठीच्या इन्स्टा हँडलवर 'भाऊचा धक्का'च्या एपिसोडमधून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रभू शेळकेवर रितेश देशमुख यांनी चांगलीच जोरदार टीका केली आहे. 'प्रभू, तुम्ही हद्दच पार केली, तुम्ही स्वत: म्हणालायत की मी 20 वर्षांचा आहे, मला त्याप्रमाणेच वागणूक द्या. आतापासून मी तुम्हाला तशीच वागणूक देणार. दोन आठवडे तुमचं कौतुक झालं, तुमचे खूप लाड झाले, आता तुम्ही 'लाडात आले आहात', फार उद्धटपणे वागात आहेत. आत्ता बस्स...' असं म्हणत रितेश देशमुख यांनी 'भाऊच्या धक्का'वर प्रभू शेळकेची कान उघडणी केली आहे.
advertisement
नुकत्याच एका एपिसोडमध्ये, सागर आणि प्रभूमध्ये चांगलीच हमरी तुमरी रंगलेली पाहायला मिळाली. प्रभू काही दिवसांपासून घरातील सदस्यांसोबत उद्धट पद्धतीने बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्या या वागण्यामुळे घरातले अनेक सदस्य त्याच्या विरोधात आहेत. याच कारणामुळे रितेश देशमुख यांनी प्रभूची कान उघडणी केली आहे. सध्या चाहत्यांकडूनही प्रभूला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. त्याचा हा स्वभाव अनेकांना खटकला असून त्याला सर्वच ट्रोल करताना दिसत आहेत. दुसऱ्या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरातून राधा पाटील गेली होती. आता तिच्या नंतर दुसऱ्या आठवड्यात कोणत्या सदस्याचा क्रमांक लागतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
advertisement
तिसऱ्या आठवड्यामध्ये, दुसरी एलिमिनेट होणारी स्पर्धक मॉडेल सोनाली राऊत असण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर सोनाली राऊत हिच घराबाहेर जाणार अशी चर्चा करत आहे. शिवाय, काही युजर्सने सुद्धा सोनाली राऊतच घरातून बाहेर गेली असल्याची पोस्ट केली आहे. आता कोणता दुसरा स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर जातो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 5:34 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6: 'तुम्ही लाडात आले आहात...', 'भाऊच्या धक्का'वर रितेश भाऊने प्रभू शेळकेची घेतली शाळा; सुनावले खडेबोल










