IND vs SA : 80 धावांवर ऑलआऊट झाली असती आफ्रिका, पण त्या 37 धावा टीम इंडियाला महागात पडणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
धर्मशालाच्या मैदानावरील तिसऱ्या टी20 सामन्यात साऊथ आफ्रिका 117 धावांवर ऑल आऊट झाली आहे.या सामन्यात पहिल्या ओव्हरपासून भारताने भेदक गोलंदाजी केली होती.
India vs South Africa 3rd T20i : धर्मशालाच्या मैदानावरील तिसऱ्या टी20 सामन्यात साऊथ आफ्रिका 117 धावांवर ऑल आऊट झाली आहे.या सामन्यात पहिल्या ओव्हरपासून भारताने भेदक गोलंदाजी केली होती. त्यामुळेच साऊथ आफ्रिका ऑल आऊट झाली होती.पण आफ्रिकात 80 धावातच ऑल आऊट झाली असती. पण आफ्रिकेने अतिरीक्त 37 धावा काढल्या आहेत. या धावा आता टीम इंडियाला महागात पडणार आहे.
advertisement
खरं तर टीम इंडियाने सूरूवातीपासून भेदक गोलंदाजी केली होती.या गोलंदाजीसमोर साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजांच्या निभाव लागत नव्हता.त्यामुळे आफ्रिकेचे झटपट विकेट पडत होते. भारतीय गोलंदाजांनी पहिल्यांदा सलामीवीरांना स्वस्तात बाद केले.त्यानंतर कर्णधार मार्करमने एका बाजूने डाव सावरसा होता.पण दुसऱ्या बाजूने एकामागून एक विकेट पडत होते.
advertisement
आफ्रिकेचे 77 धावांवर 7 विकेट पडले होते.त्यामुळे 80 आणि 90 धावात आफ्रिका ऑल आऊट होईल असे वाटत होते. पण मार्करमने एकट्याने 61 धावांची खेळी करून आफ्रिकेचा डाव 100च्या पार नेला होता.त्यामुळे साऊथ आफ्रिका 117 धावांवर ऑल आऊट झाली होती.
advertisement
आता 80 धावांवर समजा साऊथ आफ्रिका ऑल आऊट झाली असती. तर टीम इंडियाला बरंच होतं. पण त्यात आफिकेने आणखीन 37 धावा काढल्या होत्या. आता याच धावा टीम इंडियाला महागात पडणार आहेत.
advertisement
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2025 9:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 80 धावांवर ऑलआऊट झाली असती आफ्रिका, पण त्या 37 धावा टीम इंडियाला महागात पडणार










