Summer Health : थंड पाण्यासाठी माठ वापरताय? मग 'ही' चूक टाळा, नाहीतर हेच पाणी बनेल विषबाधेचं कारण!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
माठाची काळजी जर आपण योग्य पद्धतीनं घेतली नाही तर हेच अपनी आपल्यासाठी विषबाधेचं म्हणजेच फूड पॉइझनिंगचं कारण बानू शकतं.
मुंबई : उन्हाळ्यात गार पाण्यासाठी बरेच लोक माठाचा वापर करतात. फ्रिजचं पाणी प्यायल्यानं खूप लोकांना घशाचा त्रास होतो. आपल्याकडे वर्षानुवर्षे उन्हाळ्यात माठातलं पाणी पिण्याची परंपरा आहे. माठ आपल्याला केवळ थंड पाणी देत नाही, तर माठातलं पाणी आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतं.
पण याच माठाची काळजी जर आपण योग्य पद्धतीनं घेतली नाही तर हेच अपनी आपल्यासाठी विषबाधेचं म्हणजेच फूड पॉइझनिंगचं कारण बानू शकतं. होय, इंस्टाग्रामवर न्यूट्रिशनिस्ट हेतल यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवावरून माहितीव शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी माठाच्या पाण्यात तयार झालेल्या अळ्या दाखवल्या आहेत. चुकूनही असं पाणी प्यायल्यास आपल्याला अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो.
advertisement
माठात अळ्या होण्याची कारणं..
माठ चांगल्या प्रकारे स्वच्छ केलेला नसल्यास त्या पाण्याचे गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. स्वच्छ न धुतलेल्या माठात कीटकांच्या अळ्या असू शकतात. याला काही गोष्टी कारणीभूत असतात. तुम्ही माठ व्यवस्थित झाकून ठेवला नसेल किंवा माठ वेळोवेळी धुतला नसेल तर त्यामध्ये कीटकांच्या अळ्या होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर जर तुम्ही माठ पूर्ण रिकामाच होऊ दिला नाही आणि त्यात पाणीभरतच राहिलात तरीही त्यामध्ये अळ्या होण्याची शक्यता वाढते.
advertisement
माठात अळ्या होऊ नये म्हणून काय करावं?
सर्वात आधी तर माठ योग्य पद्धतीने स्वच्छ करावा. यासाठी एखाद्या रोज माठातलं पाणी संपल्यानंतर तो स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि नंतर पाण्याने धुवा. तुम्ही आणखी एक उपाय करू शकता. माठ पूर्णपणे रिकामा करा आणि स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यामध्ये पाणी भरा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माठ नेहमी झाकून ठेवा. माठात पाणी भरताना ते नेहमी स्वच्छ, गाळून भरा. यामुळे माठात कोणत्याच प्रकारचा कचरा जमणार नाही.
advertisement
आठवड्यातून दोनदा माठाची अशीही स्वच्छता करा..
दर तीन ते चार दिवसांनी माठ डीप क्लीन करायला हवा. शिवाय तुम्हाला माठाच्या पाण्यात फेस दिसला तर, तो लगेच स्वच्छ करा. रोज एकदा भांड्यातील सर्व पाणी काढून टाका आणि त्याच्या रंगात काही बदल झाला आहे का ते तपासा. रंग बदलल्यास माठ लगेच स्वच्छ करा. दर 3-4 दिवसांनी कोमट पाणी आणि मऊ ब्रशने हळुवारपणे घासून भांड्याचा आतील भाग पूर्णपणे स्वच्छ करा.
advertisement
advertisement
आठवड्यातून एकदा मठामध्ये लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा किंवा जाड मीठ यांपासून बनवलेली नैसर्गिक पेस्ट लावा आणि नंतर माठ स्वच्छ धुवा. हे सर्व घटक माठासाठी सौम्य, प्रभावी आणि सुरक्षित आहेत. शक्य असल्यास माठ स्वच्छ केल्यानंतर काही तासांसाठी उन्हात वाळवा आणि नंतर वापरा. मठाची या पद्धतीनं काळजी घेतल्यास तुम्हाला त्याचे निव्वळ फायदेच होतील.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 3:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Summer Health : थंड पाण्यासाठी माठ वापरताय? मग 'ही' चूक टाळा, नाहीतर हेच पाणी बनेल विषबाधेचं कारण!







