दोन महिन्यात राजकरणात उलटफेर, प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' भाकिताने राजकारणात खळबळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी राज्यात लवकरच मोठ्या घडामोडीचे संकेत दिले आहेत.
पुणे : राज्यात 2019सालात पासून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी राज्यात लवकरच मोठ्या घडामोडीचे संकेत दिले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या एका वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात
राज्यात महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीसोबत मविआच्या घटकपक्षांनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपात अनेक ठिकाणी वादही झडले होते होते. मात्र या निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर शिवसेना आणि भाजपानं अनेक ठिकाणी एकत्रितपणे निवडणूक लढवण्यावर दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एकमत झालंय. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंबाबत वक्तव्य केलं आहे.
advertisement
एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील?
एकनाथ शिंदे येत्या महिना दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतात का? असं वाटत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. शरद पवार चाणक्य आहेत. काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी योग्य संदेश दिला होता. मला हे आणि असच दिसत आहे. अमित शाह सारख्याला ते खिशात घालतात असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
advertisement
एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची बैठक झाल्याचं सांगत यातून योग्य संदेश देण्यात आल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. याच भेटीचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीत अनेक महापालिकांमध्ये जागावाटपावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच होणार आहे.अशातच प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
भाजप नेत्यांचा निशाणा
प्रकाश आंबेडकरांनी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत केलेलं वक्तव्य भाजप नेत्यांना मात्र रुचलेलं नाही. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी निशाणा साधला . आंबेडकरांनी त्यांचा पक्ष सांभाळावा,
त्यांना त्यांच्याच पक्षातलं माहिती नाही स्वतःच्या पक्षात काय घडतं माहिती नाही दुसऱ्या पक्षावर बोलणं टाळावं
असे म्हणत निशाणा साधला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
advertisement
राज्यात 2019नंतर मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी झाल्या. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2025 9:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन महिन्यात राजकरणात उलटफेर, प्रकाश आंबेडकरांच्या 'त्या' भाकिताने राजकारणात खळबळ










