Krushi Market: तीळाची आवक घटली, पण दर गगनाला भिडले; आल्यासह गुळाला भाव किती?
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
रविवार, दिनांक 14 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, गुळ आणि तीळाची आवक व भाव पाहू.
मुंबई: रविवार, दिनांक 14 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या चार शेतमालांमध्ये आले, गुळ आणि तीळाची आवक व भाव पाहू.
गुळास चांगला उठाव: राज्याच्या मार्केटमध्ये 2697 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 1352 क्विंटल सर्वाधिक आवक सांगली बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4245 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 605 क्विंटल गुळास प्रतीनुसार 4213 ते 4476 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
आले दरात चढ-उतार: राज्याच्या मार्केटमध्ये 869 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये 821 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 1733 ते 3767 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच सातरा मार्केटमध्ये आवक झालेल्या 11 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 1000 ते 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
तीळास चांगला उठाव: आज राज्याच्या मार्केटमध्ये 30 क्विंटल तीळाची एकूण आवक राहिली. यापैकी अकोला मार्केटमध्ये 20 क्विंटल तीळाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 10230 ते 10500 हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
December 14, 2025 8:59 PM IST









