Arijit Singh Retirement: नवीन वर्षात सर्वात मोठा धक्का! अरिजीत सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला कायमचा रामराम, शॉकिंग कारण आलं समोर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Arijit Singh Retirement: ज्याच्या गाण्यांनी कधी कोणाचं तुटलेलं मन सावरलं, तर कधी कोणाच्या प्रेमाला शब्द दिले, तो आवाज म्हणजेच अरिजीत सिंग याने गायकीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
advertisement
advertisement
अरिजीत सिंगने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक लांबलचक पोस्ट लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्याने म्हटलंय, "नमस्कार, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. इतकी वर्ष तुम्ही मला एक गायक म्हणून जे प्रेम दिलं, त्यासाठी मी तुमचा ऋणी आहे. पण आता मी एक निर्णय घेतला आहे की इथून पुढे मी प्लेबॅक व्होकलिस्ट म्हणून कोणतीही नवीन असाइनमेंट किंवा काम स्वीकारणार नाही. मी या प्रवासाला पूर्णविराम देत आहे. हा प्रवास खरोखरच विलक्षण आणि सुखद होता."
advertisement
अरिजीतने जरी चित्रपट संगीतातून निवृत्ती घेतली असली, तरी त्याचा संगीताशी असलेला संबंध तुटलेला नाही. त्याने पुढे स्पष्ट केलं की, "देव माझ्यावर खूप दयाळू आहे. मी चांगल्या संगीताचा चाहता आहे आणि भविष्यात एक छोटा कलाकार म्हणून स्वतःहून बरंच काही शिकण्याचा आणि नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या समर्थनासाठी पुन्हा एकदा आभार." याचाच अर्थ, अरिजीत आता कदाचित स्वतंत्र संगीत किंवा स्वतःच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करणार आहे.
advertisement
advertisement
'तुम ही हो' पासून सुरू झालेली अरिजीतची जादू आज प्रत्येक भारतीयाच्या प्लेलिस्टचा भाग आहे. गेल्या १५ वर्षांत त्याने बॉलिवूडला शेकडो सुपरहिट गाणी दिली. त्याच्या निवृत्तीच्या बातमीने नेटकरी भावुक झाले आहेत. काहींनी "एक पर्व संपलं" अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर काहींनी "आम्ही तुला मिस करू" असं म्हणत सोशल मीडियावर 'Arijit Singh' असा हॅशटॅग ट्रेंड करायला सुरुवात केली आहे.






