सुनेच्या बेडरुममध्ये CCTV, नाशिकमध्ये सासरच्या छळाचा कळस; लव्ह मॅरेजमुळे विवाहेतेसोबत भयंकर प्रकार
- Published by:Prachi Amale
Last Updated:
. नाशिकमध्ये सासरच्यांनी सुनेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करत विष पाजल्याचा माहेरच्यांनी केला आहे.
नाशिक: हुंडाबळीनं पुन्हा एकदा राज्य हादरलंय. पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून दीप्ती मगर या इंजिनिअर विवाहितेनं आत्महत्या केली. वैष्णवी हगवणेला अजून न्याय मिळालेला नाही. तोच आणखी एका हुंडाबळीची दुर्दैवी घटना घडलीय. मुलाचा हव्यास आणि संपत्तीचा लोभ यामुळे अजून एक आत्महत्या झाली. दरम्यान ही घटना ताजी असताना नाशिकमध्ये संतापजनक प्रकार समोर आळा आहे. नाशिकमध्ये सासरच्यांनी सुनेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करत विष पाजल्याचा माहेरच्यांनी केला आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेचे नाव महिमा मॉन्टी राजदेव असून ही उच्चशिक्षित आहे. महिमाचा मॉन्टी राजदेव याच्याशी एप्रिल २०२५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही महिन्यातच सासरच्यांकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. महिमाच्या आईने केलेल्या आरोपानुसार सासू, सासरे , पती, दीर सतत तिच्यावर संशय घेऊन घालून पाडून बोलत होते. त्यामुळे महिमा कायम दबावाखाली होती.
advertisement
मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम
एवढच नाही तर काही दिवसांपूर्वी सासरच्यांनी महिमावर चोरीचा आरोप करत तिच्या बेडरुममध्ये कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यामुळे तिच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवली जात होती आणि ती सतत भीती व मानसिक तणावाखाली राहत होती. या प्रकारांमुळे तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
अतिदक्षता विभागात उपाचार सुरू
advertisement
काही दिवसांपूर्वी महिमाचे सासरी वाद झाल्याने ती माहेरी निघून गेली होती. मात्र सासरच्यांनी महिमाला सासरी बोलवले आणि घरी गेल्यानंतर तिच्या नवऱ्याने तिला प्रचंड मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तिला विषारी औषध पाजल्याचा आरोप आहे. प्रकृती अत्यवस्थ झाल्यानंतर महिमाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपाचार सुरू आहेत.
advertisement
प्रकरणात काय कारवाई होणार?
या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. घटनेनंतर आरोपी नवरा पळून गेल्याची माहिती असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. उच्चशिक्षित, प्रेमविवाह केलेल्या विवाहितेवर सासरच्यांकडून झालेल्या या छळामुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 8:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुनेच्या बेडरुममध्ये CCTV, नाशिकमध्ये सासरच्या छळाचा कळस; लव्ह मॅरेजमुळे विवाहेतेसोबत भयंकर प्रकार









