Diabetes : मधुमेह का होतो आणि का वाढतो ? गल्लत करु नका, मधुमेह होण्याची खरी कारणं समजून घ्या
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
जीवनशैलीतले बदल, खाण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे मधुमेह होण्याचं प्रमाण वाढतंय. प्रत्येक घरात मधुमेह हातपाय पसरतोय. म्हणून, आपण कुठे चुकत आहोत हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
मुंबई : मधुमेह म्हटलं की समोर येते साखर, गोड पदार्थ. पण केवळ गोड खाल्ल्यानं मधुमेह होत नाही. मधुमेह होण्यामागे काही कारणं आहेत. ती समजून घेणं जास्त गरजेचं आहे.
जीवनशैलीतले बदल, खाण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे मधुमेह होण्याचं प्रमाण वाढतंय. प्रत्येक घरात मधुमेह हातपाय पसरतोय. म्हणून, आपण कुठे चुकत आहोत हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
डॉ. शालिनी सिंह साळुंके यांनी मधुमेहाबद्दल सांगितलेल्या पाच गोष्टी जी मधुमेहाची खरी कारणं समजून घेऊयात. डॉक्टरांच्या मते, नव्वद टक्के लोकांना मधुमेह होण्याची खरी कारण माहित नाहीत किंवा माहित असूनही त्याकडे डोळेझाक करत राहतात.
advertisement
यासाठी आजपासून तुमच्या सवयी बदला. डॉक्टरांच्या मते, गोड पदार्थ आणि भात सोडला तर मधुमेह लगेच आणि आपोआप नियंत्रणात येईल असं वाटत असेल तर तसं होणार नाही.
पहिलं कारण - इन्सुनन रेझिस्टन्स हे मधुमेहाचं मूळ कारण आहे. खाल्ल्यानंतर जड वाटणं, झोप येणं आणि ब्रेन फॉग जाणवणं यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका नव्वद टक्क्यांनी वाढतो.
advertisement
दुसरं कारण - पोटाची चरबी आणि शारीरिक निष्क्रियता: डॉक्टरांच्या मते, पोटाची चरबी काही हार्मोन्स सोडते जे इन्सुलिनला ब्लॉक करतात.
तिसरं कारण - जास्त कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाणं आणि वारंवार खाणं अत्यंत हानिकारक ठरु शकतं. तुम्ही दर दोन ते तीन तासांनी खात असाल तर तुम्हाला वारंवार इन्सुलिन स्पाइक्सचा अनुभव येईल, ज्याचा परिणाम हळूहळू स्वादुपिंडावर होईल.
advertisement
चौथं कारण - जास्त ताण आणि कमी झोपेमुळे शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढेल, पण कॉर्टिसोल इन्सुलिनचा शत्रू आहे.
पाचवं कारण: कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असेल, तर तुम्हालाही मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 7:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes : मधुमेह का होतो आणि का वाढतो ? गल्लत करु नका, मधुमेह होण्याची खरी कारणं समजून घ्या









