Pawan Kalyan First Wife: साऊथ सुपरस्टार पवन कल्याणची पहिली पत्नी नंदिनी आता काय करते? सिनेसृष्टीपासून लांब जाताच कसं आयुष्य जगते?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
राजकारणातील त्यांचा दबदबा आणि पडद्यावरची त्यांची जादू आज सर्वांना माहीत आहे. पण, या जगाच्या मागे एक असं आयुष्य दडलंय, जे काळाच्या ओघात कुठेतरी हरवून गेलं आहे.
एखाद्या व्यक्तीचं यश आणि प्रसिद्धी जेव्हा आभाळाला स्पर्श करते, तेव्हा जगाला फक्त त्याचं लख्खं वर्तमान दिसतं. आज आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे 'पावर स्टार' म्हणून ओळखले जाणारे पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्याबद्दलही असंच काहीसं म्हणता येईल. राजकारणातील त्यांचा दबदबा आणि पडद्यावरची त्यांची जादू आज सर्वांना माहीत आहे. पण, या जगाच्या मागे एक असं आयुष्य दडलंय, जे काळाच्या ओघात कुठेतरी हरवून गेलं आहे.
advertisement
advertisement
90 च्या दशकातील. पवन कल्याण तेव्हा विशाखापट्टणम येथील 'सत्यनंद ॲक्टिंग इन्स्टिट्यूट'मध्ये अभिनयाचे धडे गिरवत होते. तिथेच त्यांची ओळख विशाखापट्टणममधील एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी नंदिनी हिच्याशी झाली. हे प्रेमविवाह नसून दोन्ही घरच्यांच्या संमतीने ठरलेलं लग्न होतं. 1997 मध्ये हैदराबादमध्ये मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडलं. तेव्हा पवन 26 वर्षांचे होते, तर नंदिनी अवघ्या 19 वर्षांची होती. पवन तेव्हा मोठे स्टार नसल्यामुळे हे जोडपं कोणत्याही मीडिया प्रसिद्धीशिवाय आपलं वैयक्तिक आयुष्य जगत होतं.
advertisement
हे सुखी संसार फार काळ टिकला नाही. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांतच (1999 पर्यंत) त्यांच्यात मतभेद सुरू झाले आणि ते एकमेकांपासून वेगळे राहू लागले. नेमक्या याच काळात पवन कल्याण यांचं करिअर यशाच्या शिखरावर होतं. 'बद्री' आणि 'जॉनी' या चित्रपटांच्या दरम्यान त्यांची भेट अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी झाली. हे नातं पुढे इतकं वाढलं की ते दोघे 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहू लागले. मात्र, त्यावेळी पवन यांनी नंदिनीला अधिकृतपणे घटस्फोट दिलेला नव्हता.
advertisement
अनेक वर्षे गुप्त असलेलं हे प्रकरण 2007 मध्ये अचानक चव्हाट्यावर आलं. नंदिनी यांनी विशाखापट्टणम न्यायालयात धाव घेत पवन कल्याण यांच्यावर कायदेशीर घटस्फोट न घेता दुसऱ्या महिलेसोबत राहिल्याचा (Bigamy) आरोप केला. त्याकाळी ही बातमी टीव्ही चॅनेलवर आगीसारखी पसरली होती. मात्र, पवन कल्याण यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की त्यांनी रेणू देसाई यांच्याशी विवाह केलेला नाही, ते केवळ सोबत राहत आहेत. पुराव्याअभावी हे प्रकरण न्यायालयातून फेटाळण्यात आले.
advertisement
2008 मध्ये पवन कल्याण यांनी अधिकृतपणे घटस्फोटासाठी अर्ज केला आणि ऑगस्ट 2008 मध्ये त्यांना कायदेशीररीत्या वेगळं करण्यात आलं.त्यावेळी अशा चर्चा होत्या की सेटलमेंटचा भाग म्हणून पवन कल्याण यांनी नंदिनी यांना सुमारे 5 कोटी रुपये पोटगी म्हणून दिले होते. या कायदेशीर लढाईनंतर नंदिनी यांनी पूर्णपणे मौन पाळलं. रेणू देसाई यांच्यासारखं त्यांनी कधीही मीडियाला मुलाखत दिली नाही किंवा सोशल मीडियावर त्या सक्रिय राहिल्या नाहीत.
advertisement
नंदिनी आता कुठे आहे? काय आहे तिची नवीन ओळख?विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोटानंतर नंदिनी यांनी भारताचा निरोप घेतला आणि त्या अमेरिकेत (USA) स्थायिक झाल्या. तिथे त्यांनी आपलं जुनं आयुष्य मागे टाकत एका एनआरआय (NRI) डॉक्टरशी लग्न केलं. असं म्हटलं जातं की त्यांनी आपलं नाव बदलून आता 'जाह्नवी' असं ठेवलं आहे. त्या आता पूर्णपणे एकांत आयुष्य जगत आहेत. पवन कल्याण यांचं राजकीय यश, त्यांचं सध्याचं कुटुंब किंवा त्यांच्या उपमुख्यमंत्री होण्याशी जाह्नवी (नंदिनी) यांचा कोणताही संबंध नाही.









