advertisement

शरिरासाठी आरोग्यदायी, खरेदी करा पारंपरिक पौष्टिक पदार्थ, किंमत फक्त 120 रुपये

Last Updated:

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मैदा, जास्त तेल आणि कृत्रिम घटकांमुळे वाढणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून हा ब्रँड 100 टक्के नैसर्गिक, पौष्टिक आणि पारंपरिक धान्यांवर आधारित पदार्थ उपलब्ध करून देत आहे.

+
News18

News18

मुंबई : खाद्यपदार्थांमध्ये आरोग्यदायी पर्यायांचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी ग्रो हेल्दी फूड या फूड ब्रँडने हेल्दी तसेच मिलेट-आधारित खाद्यपदार्थांची आकर्षक श्रेणी बाजारात आणली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मैदा, जास्त तेल आणि कृत्रिम घटकांमुळे वाढणाऱ्या आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून हा ब्रँड 100 टक्के नैसर्गिक, पौष्टिक आणि पारंपरिक धान्यांवर आधारित पदार्थ उपलब्ध करून देत आहे.
ग्रो हेल्दी फूडच्या उत्पादनांमध्ये ज्वारीचा ऑइल-फ्री चिवडा विशेष लोकप्रिय ठरत असून त्याची किंमत फक्त 150 रुपये आहे. यासोबतच बाजरीचे नूडल्स 120 रुपयांना उपलब्ध असून हे नूडल्स पूर्णपणे मैदा-फ्री आहेत. आरोग्याबरोबरच चवीचीही काळजी घेत मोरिंगाचा पास्ता आणि रेड राइस नूडल्ससुद्धा ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहेत. ही सर्व उत्पादने 100 टक्के मैदा-फ्री असल्यामुळे फिटनेसप्रेमी, लहान मुले तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतात.
advertisement
घरगुती पारंपरिक पदार्थांसाठी ज्वारीचा रवा देखील उपलब्ध असून त्याचा उपयोग उपमा आणि शिरा यांसाठी करता येतो. या उत्पादनाची किंमत 150 रुपये आहे. याशिवाय नाचणीचे टोस्ट हे आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन असून ते मैदा-फ्री, प्रिझर्वेशन-फ्री आणि फूड कलर-फ्री आहेत. आरोग्यदायी स्नॅक्स म्हणून त्यांना मोठी मागणी असून त्यांची किंमत देखील 150 रुपये ठेवण्यात आली आहे.
advertisement
ब्रँडच्या बेकरी उत्पादनांमध्ये ज्वारी आणि रागीचा ब्रेड अर्धा किलो पॅकमध्ये 200 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच खाकरे देखील येथे मिळतात, ज्यामध्ये गहू, ज्वारी आणि उपवासाचे खाकरे यांचा समावेश आहे. हे सर्व खाकरे पूर्णपणे ऑइल-फ्री असल्यामुळे आरोग्य जपणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय ठरत आहेत.
यासोबतच ग्रो हेल्दी फूडमध्ये ऑर्गॅनिक ग्रेन्ससुद्धा उपलब्ध असून त्यामध्ये तूर डाळ, इंद्रायणी राइस, ब्लॅक राइस आणि इतर अनेक धान्यांचा समावेश आहे. हे सर्व हेल्दी आणि दर्जेदार पदार्थ ऑनलाइन मागवण्यासाठी 9657716707 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. बदलत्या जीवनशैलीत आरोग्य जपण्यासाठी आणि पारंपरिक पौष्टिक अन्नाचा स्वीकार करण्यासाठी ग्रो हेल्दी फूड हा ब्रँड निश्चितच विश्वासार्ह आणि उपयुक्त ठरत आहे.
view comments
मराठी बातम्या/Food/
शरिरासाठी आरोग्यदायी, खरेदी करा पारंपरिक पौष्टिक पदार्थ, किंमत फक्त 120 रुपये
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement