advertisement

Chaitra Navratri 2026: गुढीपाडवा-चैत्र नवरात्र सुरू होण्याआधी घरी आणाव्या या गोष्टी; दुर्गेच्या कृपेने धनवृद्धी

Last Updated:

Chaitra Navratri 2026: गुढीपाडव्यापासून मराठी चैत्र महिन्याला आणि चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असते. 19 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरूवात होत असून समाप्ती 27 मार्च 2026 रोजी होईल. चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. या काळात देवी दुर्गेची उपासना केल्याने घरात सुख-समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार..

News18
News18
मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवसापासून मराठी चैत्र महिन्याला आणि चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असते. 19 मार्चपासून चैत्र नवरात्रीला सुरूवात होत असून समाप्ती 27 मार्च 2026 रोजी होईल. चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते.
या काळात देवी दुर्गेची उपासना केल्याने घरात सुख-समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार, चैत्र नवरात्री सुरू होण्यापूर्वी काही शुभ वस्तू घरी आणणे अत्यंत लाभदायक मानले जाते. या वस्तू घरी आणल्याने वास्तू दोष दूर होतात आणि सकारात्मकता टिकून राहते. चैत्र नवरात्रीपूर्वी कोणत्या वस्तू घरी आणाव्यात ते जाणून घेऊया.
कलश - नवरात्रीमध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापना केली जाते. अशा परिस्थितीत चैत्र नवरात्रीपूर्वी पितळ किंवा तांब्याचा कलश नक्कीच घरी घेऊन या. हे दोन्ही प्रकारचे कलश पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात.
advertisement
मोरपंख - चैत्र नवरात्रीपूर्वी मोरपंख घरी आणणे खूप शुभ मानले जाते. नवरात्री सुरू होण्यापूर्वी मोरपंख घराच्या मंदिरात किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवावा. असे केल्याने घराचा वास्तू दोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
advertisement
सोने किंवा चांदीचे नाणे - चैत्र नवरात्रीपूर्वी सोने किंवा चांदीचे नाणे खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये हे नाणे पूजास्थळी ठेवा आणि नंतर तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. असे केल्याने आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते आणि घरात संपन्नता तसेच समृद्धी टिकून राहते.
advertisement
सोळा शृंगार साहित्य - चैत्र नवरात्रीपूर्वी सोळा शृंगाराच्या वस्तू खरेदी करून ठेवाव्यात. नवरात्रीमध्ये देवी दुर्गाला सोळा शृंगाराचे साहित्य अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता येते आणि पती-पत्नीमधील नाते पूर्वीपेक्षा अधिक चांगले व्हायला त्याने मदत होते.
advertisement
कमळाचे फूल - नवरात्रीच्या एक दिवस आधी कमळाचे फूल खरेदी करून ठेवा. त्यानंतर ते देवी दुर्गाच्या चरणी अर्पण करा. देवी दुर्गेला कमळाचे फूल अर्पण केल्याने घरात सुख-शांती आणि समृद्धी लाभते. यामुळे घराचा साठा धनधान्याने भरलेला राहतो.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Chaitra Navratri 2026: गुढीपाडवा-चैत्र नवरात्र सुरू होण्याआधी घरी आणाव्या या गोष्टी; दुर्गेच्या कृपेने धनवृद्धी
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement