advertisement

Thane Crime : बापापासून तोडण्यासाठी आईचा थरकाप उडवणारा डाव; पोटच्या मुलाला मिळवण्यासाठी ओलांडल्या सर्व मर्यादा

Last Updated:

Thane Crime News : पोटच्या मुलाला आईने तिच्या सोबत राहण्यासाठी एक हद्दच पार केली आहे. या प्रकरणी महिलेविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.

News18
News18
ठाणे : आई आपल्या पोटच्या मुलासाठी काहीही करण्यास तयार असते आणि त्याच्या भल्यासाठी नेहमीच प्रयत्न करते. मात्र ठाणे शहरातून समोर आलेल्या एका घटनेने याला धक्का दिला असून या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील एक जोडप्यांच्या घटस्फोटाचा दावा न्यायालयात सुरु आहे, त्यामुळे ते काही महिन्यांपासून वेगळे राहत होते. त्यातील महिला ही कशेळी येथे राहत असून तिचा नवरा वागळे इस्टेट परिसरात राहतो आणि यांना एक 12 वर्षाचा मुलगाही आहे जो वडिलांसोबत आणि त्यांच्या आजीसोबत राहतो.
पतीच्या घरी गेली अन्...
दरम्यान 11 मार्च च्या रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास महिला पतीच्या घरी पोहचली. तेथे तिने मुलाला ''माझ्या सोबत राहण्यासाठी का येत नाही..? 'असा विचारले. मात्र त्यावर तिच्या मुलाने नकार दिला. त्यानंतर ती संतापवली आणि मुलाला मारहाण केली.
advertisement
घटनेवेळी घरात महिलेची सासू उपस्थित होती त्यामुळे तिने वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. पण रागात असलेल्या महिलेने सासूला शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचे सांगितले जात आहे. सध्या या घटनेची तक्रार श्रीनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केलेला आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Crime : बापापासून तोडण्यासाठी आईचा थरकाप उडवणारा डाव; पोटच्या मुलाला मिळवण्यासाठी ओलांडल्या सर्व मर्यादा
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement