advertisement

सकाळी घराबाहेर पडलेली प्रतीक्षा परतलीच नाही; 6 दिवसांनी लेकीला त्या अवस्थेत पाहून सरकली कुटुंबाच्या पायाखालची जमीन

Last Updated:

प्रतीक्षा ही शिक्षण घेत असून ती शारदानगर येथे वास्तव्यास होती. ९ मार्च रोजी सकाळी ती घरातून बाहेर पडली होती, मात्र बराच वेळ उलटूनही ती परतली नाही.

तरुणीनं आयुष्य संपवलं (प्रतिकात्मक फोटो)
तरुणीनं आयुष्य संपवलं (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : बारामती तालुक्यातील शारदानगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह माळेगाव खुर्द-केव्हीके रस्त्यालगतच्या एका विहिरीत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा दत्तात्रेय मेमाणे असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे मेमाणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काय घडलं?
प्रतीक्षा ही शिक्षण घेत असून ती शारदानगर येथे वास्तव्यास होती. ९ मार्च रोजी सकाळी ती घरातून बाहेर पडली होती, मात्र बराच वेळ उलटूनही ती परतली नाही. कुटुंबीयांनी आपल्या स्तरावर नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींकडे तिची शोधाशोध केली. मात्र तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर अखेर वडिलांनी माळेगाव पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांसह गावकरी आणि मित्रपरिवारानेही तिचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते.
advertisement
अशातच शनिवारी सकाळी माळेगाव खुर्द-केव्हीके रस्त्यावरील विहिरीत एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. यावेळी तो मृतदेह बेपत्ता असलेल्या प्रतीक्षा मेमाणे हिचाच असल्याचे स्पष्ट झाले.
सध्या पोलिसांनी या प्रकरणाची 'अकस्मात मृत्यू' अशी नोंद केली असून, प्रतीक्षाने विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, तिने हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले? यामागील कारणांचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सय्यद करत आहेत. या घटनेने बारामतीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
सकाळी घराबाहेर पडलेली प्रतीक्षा परतलीच नाही; 6 दिवसांनी लेकीला त्या अवस्थेत पाहून सरकली कुटुंबाच्या पायाखालची जमीन
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement