Vastu Tips: सतत आर्थिक अडचणीत, आवक घटलीय? आज आत्ता पाहा घरातील या 7 गोष्टी नीट आहेत का!
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips: घराच्या आर्थिक स्थिरतेसाठी आपण सगळेच प्रयत्न करत असतो. काहींच्या बाबतीत खूप मेहनत करूनही पैसा घरात टिकत नाही किंवा विनाकारण खर्च वाढत राहतात. यासाठी आज आपण काही वास्तू टिप्स जाणून घेऊ.
advertisement
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशमार्ग मानला जातो. त्यामुळे दरवाजाला तडे गेले असतील, बिजागऱ्या ढिल्या असतील किंवा कुलूप खराब झाले असेल, तर ते लगेच बदलणे/दुरुस्त करणे गरजेचे आहे. मुख्य दरवाजापाशी पुरेशी प्रकाशयोजना असावी. तसेच दरवाजाजवळ रोपे किंवा विंड चाइम लावणे शुभ मानले जाते, कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येते.
advertisement
advertisement
advertisement
उत्तर-पूर्व दिशा ही वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानली जाते. जर तुम्हाला घरात फिश टँक (एक्वेरियम), छोटा कारंजे किंवा पाण्याने भरलेले भांडे ठेवायचे असेल, तर ते याच दिशेला ठेवावे. जल तत्व या दिशेला असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. तसेच, ही दिशा धनदेवता कुबेराशी संबंधित असल्याने हा कोन नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवावा. तिथे जड फर्निचर किंवा भंगार सामान ठेवू नये.
advertisement
घरात झाडे लावल्याने सकारात्मकता वाढते, विशेषतः मनी प्लांटला समृद्धीचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला लावणे शुभ असते. त्याची हिरवी पाने घराचे सौंदर्य तर वाढवतातच पण वातावरणातही सकारात्मकता निर्माण करतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








