'गॅस'नं वाढवलं टेन्शन, आता एका चुकीनं होईल बँक खातं रिकामं, तुमच्यावर वेळ येण्यापूर्वी पाहा काय घडतंय?
Last Updated:
Gas Booking Scam : ऑनलाइन गॅस बुकिंग करताना एका चुकीमुळे सायबर गुन्हेगार तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. बनावट लिंक, कॉल किंवा अॅपच्या माध्यमातून फसवणूक केली जाते.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचे परिणाम भारतात गॅस टंचाईने जाणवत आहेत. अशा परिस्थितीत सायबर भामटेही सक्रिय झाल्याचे समोर आले आहे.
हॅकिंगचा नवा प्रकार
राज्यभरात सध्या गॅस बुकिंगच्या नावाने मोठ-मोठे सायबर गुन्हे घडत असल्याच्या घटना समोर येत आहे. त्यात आता सध्या गॅस टंचाईच्या भीतीने अनेकजण सिलिंडर बुक करण्याचा प्रयत्न करच आहेत हीच घाई सायबर गुन्हेगारांसाठी संधी ठरत आहे. ही फसवणूक नेमकी कशी होते नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
advertisement
ओटीपी शेअर केला अन् बँक खाते साफ?
1) गॅस बुक करताना सायबर भामटे हे पहिल्यांदा तर बनावट वेबसाइट्स तयार करतात जे हुबेहूब अधिकृत कंपन्यांसारख्या दिसतात.
2)जेव्हा ग्राहक चुकून या चुकीच्या वेबसाइटवर जाऊन काही तक्रारी करतात तेव्हा तिथे दिलेल्या नंबरवर कॉल केल्यास समोरील व्यक्ती हा स्वत:ला गॅज एजन्सीचा प्रतिनिधी सांगतो.
3)यानंतर गॅस बुकिंग कन्फर्म करण्यासाठी ओटीपी मागून घेतात आणि अॅडव्हान्स पेमेंट भरण्यास सांगितले जाते,ज्यातच ग्राहक अडकतो आणि पैसे भरताच नंबर बंद होतो आणि त्या ग्राहकाची सायबर फसवणूर होते.
advertisement
कशी घ्याल काळजी?
1) ग्राहकांनी कधीही गॅस बुकिंगसाठी कंपनीच्या अधिकृत मोबाईल अॅप शिवाय वेबसाइटचाच वापर करावा.
2) गॅस बुकिंग करताना व्हॉट्अॅप तसेच एसएमएसद्वारे तुमच्यापर्यंत आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर चुकूनही क्लिक करुन पेमेंट करु नका.
3)महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिकृत गॅस कंपन्या फोनवर कधीच ग्राहकांना ओटीपी किंवा पिन तसेच बँक खात्याची माहिती मागत नाहीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 8:04 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'गॅस'नं वाढवलं टेन्शन, आता एका चुकीनं होईल बँक खातं रिकामं, तुमच्यावर वेळ येण्यापूर्वी पाहा काय घडतंय?







