Weather Alert: 11 ते 4 घरीच थांबा! दुहेरी संकटानं टेन्शन वाढलं, महाराष्ट्रात 72 तासांसाठी अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात मार्चच्या मध्यावर दुहेरी संकट घोंघावत आहे. उष्णतेची लाट असतानाच काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट दिला आहे.
आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ." width="1600" height="900" /> मार्च महिन्याच्या मध्यावर महाराष्ट्रात हवामानाचं दुहेरी संकट जाणवत आहे. काही भागात उष्णतेची लाट असतानाच काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा आहे. आज, 15 मार्च रोजी कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत ‘हिट वेव्ह’चा इशारा आहे. तर बहुतांश विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
advertisement
मध्य महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांत पारा चांगलाच चढला होता. आता मात्र अवकाली संकट घोंघावत आहे. आज सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट आहे. पुण्यात हलका पाऊस तर कोल्हापुरात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, पुढील 2-3 दिवस संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान, राज्यात 15 मार्चला मुख्यतः कोरडे आणि उष्ण हवामान राहील. तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे. तर काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत तापमानात हळूहळू घट होईल, आणि 17-20 मार्चदरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वाढेल. आज उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी दुुपारी 11 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळावे.





