advertisement

Iran War: खार्ग बेट उद्ध्वस्त! ट्रम्प यांची नवी धमकी ऐकून इराणचाही घातक पलटवार, अमेरिका-इस्रायलला झटका

Last Updated:

Iran US Conflict: मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका खळबळजनक वक्तव्याने आता युद्धाच्या आगीत आणखीच तेल ओतले आहे.

खार्ग बेट उद्ध्वस्त! ट्रम्प यांची नवी धमकी ऐकून इराणचाही घातक पलटवार, अमेरिका-इस्रायलला झटका
खार्ग बेट उद्ध्वस्त! ट्रम्प यांची नवी धमकी ऐकून इराणचाही घातक पलटवार, अमेरिका-इस्रायलला झटका
वॉशिंग्टन/तेहरान: मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका खळबळजनक वक्तव्याने आता युद्धाच्या आगीत आणखीच तेल ओतले आहे. अमेरिकन हल्ल्यात इराणच्या खार्ग बेटाचा मोठा हिस्सा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इतकेच नाही तर, "आम्ही केवळ मनोरंजनासाठी देखील या बेटाला पुन्हा लक्ष्य करू शकतो," अशी प्रक्षोभक धमकीही त्यांनी दिली आहे. खार्ग बेटावर झालेला हल्ला आणि ट्रम्प यांच्या धमकीने खवळलेल्या इराणने जोरदार पलटवार केला आहे.

इराणचा संताप, अमेरिकन तळांना लक्ष्य केले

ट्रम्प यांच्या या धमकीनंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत हल्ले तीव्र केले आहेत. इराणने युएई (UAE), बहरीन आणि कुवेत मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे मोठा हल्ला चढवला. इराणकडून इस्रायलच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करणे सुरू आहे. इस्रायलच्या हल्ल्यांना इराण प्रत्युत्तर देत आहे.
रामला आणि होलोन शहरात आग
इस्रायली लष्करी रेडिओच्या वृत्तानुसार, इराणने डागलेली अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली. मात्र, या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचे अवशेष मध्य इस्रायलमधील रामला शहरात पडल्याने तिथे भीषण आग लागली. तसेच, तेल अवीवच्या दक्षिणेस असलेल्या होलोन शहरातही आगीच्या घटना समोर आल्या आहेत. सुदैवाने, या घटनांमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
advertisement

अमेरिकन लष्कराचे १३ जवान ठार

दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने इराक मध्ये झालेल्या लष्करी विमान अपघातात मृत्यू झालेल्या ६ सैनिकांची नावे जाहीर केली आहेत. इराणसोबत सुरू असलेल्या या संघर्षात आतापर्यंत अमेरिकेच्या १३ सैनिकांचा मृत्यू झाला असून, सुमारे १४० सैनिक जखमी झाले आहेत. यापैकी ८ सैनिकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran War: खार्ग बेट उद्ध्वस्त! ट्रम्प यांची नवी धमकी ऐकून इराणचाही घातक पलटवार, अमेरिका-इस्रायलला झटका
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement