लॉटरी लागली! मुंबईत हक्काचं घर मोफत मिळणार, कुणाचं नशीब पालटणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Last Updated:
Mumbai : मुंबईतील अनेक रहिवाशांना मोफत 2 बीएचके घर मिळणार आहे. अनेक वर्षे छोट्या खोलीत राहणाऱ्या कुटुंबांचे आता स्वतःच्या मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कोणाला मिळणार हे घर जाणून घ्या.
मुंबई : मुंबई शहरात बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. यात काही रहिवशांना इमारतीतील घराच्या चाव्या देण्यात येणार आहेत. मात्र नक्की कोणत्या भागातील नागरिकांना ही संधी आहे शिवाय कोणाला पहिल्यांदा घर मिळणार आहेत ते जाणून घ्या.
मुंबईत कोणाला मिळणार मोफत घर?
मुंबईतील बीडीडी चाळीत अनेक कुटुंबे गेल्या दोन ते तीन पिढ्यांपासून अवघ्या 160 चौरस फुटांच्या खोलीत राहत होती. मात्र आता या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत नायगावा येथील पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 5 इमारतींमधील 864 पात्र रहिवासांना म्हाडामार्फत सुमारे 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाचे 2 बीएचके घर मालकी हक्काने मोफत दिली जाणार आहेत.
advertisement
सध्या म्हाडाकडून नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात एकूण 20 पुनर्वसन टॉवर उभारले जात असून याच प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पुनर्वसन इमारत क्रमांक एकमधील आठ टॉवरमधील 864 रहिवाशांना घर दिले जाणार आहेत तर राहिलेल्या 537 घरांचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात असून एप्रिलपर्यंत ते होण्याची शक्यता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 12:05 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
लॉटरी लागली! मुंबईत हक्काचं घर मोफत मिळणार, कुणाचं नशीब पालटणार? जाणून घ्या एका क्लिकवर







