LPG Gas News | इराण-इस्रायल आणि अमेरिकेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस टंचाईची भीती निर्माण झाली आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत मुंबई आणि उपनगरांमध्ये LPG गॅस सिलेंडरच्या नावाने ऑनलाइन scam सुरू झाल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांत लोकांना बनावट कॉल, SMS आणि WhatsApp लिंक पाठवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. डोंबिवलीत तर एका महिलेला जवळपास ३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. हा scam नेमका कसा केला जातो आणि अशा फसवणुकीपासून तुम्ही स्वतःला कसे वाचवू शकता हे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. सावध रहा आणि सुरक्षित राहा.



