Success Story : शेतकऱ्यानं चालवलं डोकं, 14 गुंठे शेतात केली आंतरपीक शेती, उत्पन्न मिळणार लाखात, असं काय केलं? Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
टोमॅटोची संपूर्ण तोडणी झाल्यावर टोमॅटोच्या बेडवर बॉल सुंदरी या बोरांच्या झाडांची लागवड केली असून टोमॅटोच्या बेडवर आंतरपीक म्हणून दोडक्याची लागवड केली आहे.
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्याने प्रयोगशील शेती केली आहे. टोमॅटोची संपूर्ण तोडणी झाल्यावर टोमॅटोच्या बेडवर बॉल सुंदरी या बोरांच्या झाडांची लागवड केली असून टोमॅटोच्या बेडवर आंतरपीक म्हणून दोडक्याची लागवड केली आहे. 14 गुंठ्यामध्ये हा प्रयोग शेतकरी नितीन खडसरे यांनी केला आहे. या संदर्भात अधिक माहिती नितीन खडसरे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात राहणारे शेतकरी नितीन खडसरे यांनी 14 गुंठ्यात टोमॅटोची लागवड केली होती. टोमॅटोच्या लागवडीसाठी 14 गुंठ्यात यासाठी खडसरे यांना 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत खर्च आला होता. यंदा बाजारात टोमॅटोला दर चांगला मिळाला असून एक लाख रुपयांचा नफा टोमॅटो विक्रीतून नितीन यांना मिळाला. मिळालेल्या नफ्यातून त्यांनी बॉल सुंदरी या बोरांच्या झाडांची लागवड केली असून त्यामध्ये आंतरपीक म्हणून दोडक्याची लागवड केली आहे.
advertisement
दोडक्याची लागवड करून वीस दिवस झाले असून लागवडीच्या एक महिन्यानंतर दोडक्याच्या तोडणीला सुरुवात होणार आहे. तर बॉल सुंदरी या झाडांची लागवड करून 1 महिना झाला असून सहा महिन्यानंतर बोरां पासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर 14 गुंठ्यात लागवड केलेल्या टोमॅटोतून लागवडीचा खर्च वजा करून खडसरे यांना 1 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.
advertisement
दोडक्यावर भुरी, केवडा, फळकूज हा रोग होऊ नये म्हणून यासाठी नितीन खडसरे हे वेळोवेळी फवारणी करत आहेत. 14 गुंठ्यामध्ये जवळपास 80 बॉल सुंदरी या बोरांच्या झाडांची रोपे लावण्यात आले आहेत. टोमॅटो नंतर दोडका आणि या बॉलसुंदरी बोरांच्या माध्यमातून लागवडीचा खर्च वजा करून जवळपास 14 गुंठ्यातून 2 लाखांचा नफा मिळणार असल्याची माहिती नितीन खडसरे यांनी दिली. शेतीचे क्षेत्रफळ कितीही असो शेतामध्ये पिकाची माहिती घेऊन लागवडीचा खर्च आणि मिळणारा नफा याचा विचार करून शेती केल्यास आर्थिक नफा अधिक मिळतो असा सल्ला प्रयोगशील शेतकरी नितीन खडसरे यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 3:30 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शेतकऱ्यानं चालवलं डोकं, 14 गुंठे शेतात केली आंतरपीक शेती, उत्पन्न मिळणार लाखात, असं काय केलं? Video








