advertisement

'रक्तामधील कावीळ आणि...' या दीर्घ आजाराशी झुंज देत होता इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदम, सांगताना इमोशनल झाला मित्र

Last Updated:
influencer Prathamesh Kadam Death : प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं 26 जानेवारी रोजी निधन झालं. प्रथमेश दीर्घ काळापासून दोन गंभीर आजाराशी झुंज देत होता.
1/9
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सगळेच शॉक झालेत. त्याच्याबाबत असं काही होऊ शकतं यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाहीये. 26 जानेवारी 2026 रोजी पहाटे 4 वाजता प्रथमेशचं निधन झालं. 

2/9
प्रसिद्ध कंटेट क्रिएटर आणि इन्फ्लुएन्सर तन्म पटेकर याने पहिल्यांदा प्रथमेशच्या निधनाची माहिती दिली. तन्मयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्याची पोस्ट वाचून सगळेच शॉक झाले. 

3/9
 "तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश, देवाघरी स्वतःची काळजी घे रे ! खूप आठवण येईल तुझी Miss You Bhai",असं म्हणत तन्मयने भावना व्यक्त केल्या होत्या. तसंच त्याच्या अंत्यविधीचे डिटेल्स देखील शेअर केले होते. 

4/9
कोरोना काळात प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर आई आणि बहिणीच्या पाठिशी तो वडिलांप्रमाणे उभा राहिला. सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्याने आईला रीलस्टार बनवलं. प्रथमेश आणि त्याच्या आईची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली. 

5/9
प्रथमेशला नेमकं काय झालं असा प्रश्न त्याचे लाखो चाहते विचारत होते. ज्याने प्रथमेशच्या निधनाची माहिती दिली त्या तन्मयनेच प्रथमेशला काय झालं होतं हे देखील सांगितलं आहे. तन्मयने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत प्रथमेशच्या आजारपणाची चुकीची माहित देणाऱ्यांना देखील झापलं आहे. 

6/9
तन्मयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय,
तन्मयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आजारपणात आपण तिथे सोबत किंवा उपस्थित नव्हतो अशांनी चुकीच्या अफवा पसरवून त्याच्या घरातील लोकांना मानसिक त्रास देऊ नका."
advertisement
7/9
 "प्रथमेश हा टायफॉइड आणि रक्तामधील कावीळ या दीर्घ आजाराने त्रस्त होता आणि बरेच उपचार करूनसुद्धा डॉक्टरांच्या इलाजाला यश आलं नाही. शेवटी आपल्या हातात काही नसतं कारण असं म्हणतात, जो आपडे सर्वांना तोचि आवडे देवाला."

8/9
तन्मयने पुढे लिहिलंय,
तन्मयने पुढे लिहिलंय, "आज त्याची आई आणि बहिण सर्वांना उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांना त्रास होईल किंवा वाईट वाटेल अशा कोणत्याही आजाराच्या चुकीच्या अफवा पसरवू नका. त्यांचं द:ख समजून घेऊन आपण त्यात सहभागी होणं हे आपलं काम आहे."
advertisement
9/9
प्रथमेशवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान रुग्णालयातील कॉमेडी रील्सही त्याने शेअर केले होते.  प्रथमेशच्या मृत्यूपश्चात त्याची आई प्रज्ञा कदम आणि लहान बहिण आहे. प्रथमेशच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. 

Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement