आधी बॉयफ्रेंडच्या नावाने ढसाढसा रडली, घराबाहेर येताच राधा पाटीलचा यू-टर्न; लिव्ह-इन पार्टनरबद्दल शॉकिंग स्टेटमेंट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
BBM6 Radha Patil: ज्या बॉयफ्रेंडच्या आठवणीत राधा घरात ढसाढसा रडली होती, ज्याच्यासाठी तिने प्रेमाचे गोडवे गायले होते, त्याच्याबद्दलच आता तिने खळबळजनक विधान केलं आहे.
'बिग बॉस मराठी ६' च्या घरातून पहिलं एलिमिनेशन झालं आणि डान्सर राधा पाटील मुंबईकरचा प्रवास संपला. पण घराबाहेर येताच राधाने असा काही पवित्रा घेतलाय की, प्रेक्षकांना धक्काच बसला आहे. ज्या बॉयफ्रेंडच्या आठवणीत राधा घरात ढसाढसा रडली होती, ज्याच्यासाठी तिने प्रेमाचे गोडवे गायले होते, त्यालाच आता तिने चक्क आपला भूतकाळ ठरवलं आहे.
advertisement
घरात असताना राधा अनुश्री मानेसोबत आपल्या मनातील गुपितं शेअर करत होती. तेव्हा तिने आपल्या रिलेशनशिपबद्दल भरभरून गप्पा मारल्या होत्या. राधा म्हणाली होती, "आम्ही ३ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहतोय. तो इतका माझ्यावर अवलंबून आहे की, त्याने गेल्या तीन वर्षांत स्वतःच्या हाताने जेवणही केलेलं नाही. मीच त्याला घास भरवते. तो दिसायला एखाद्या 'देसी बॉय'सारखा आहे आणि लोक त्याच्यासोबत फोटो काढायला गर्दी करतात."
advertisement
advertisement
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिला जेव्हा तिच्या बॉयफ्रेंडबद्दल विचारलं, तेव्हा ती म्हणाली, "लोकांनी माझ्या बोलण्याचे रिल्स बनवले आणि ते व्हायरल झाले. पण खरं सांगायचं तर, तो माझा भूतकाळ होता. अनुश्री तिच्या पास्टबद्दल सांगत होती आणि मी माझ्या. मी आधी एका पॉडकास्टमध्येही स्पष्ट केलं होतं की मी आता रिलेशनशिपमध्ये नाहीये."
advertisement
advertisement
advertisement









