Chicken : चिकनचा कोणता भाग खायचा नसतो? ज्यामुळे कॅन्सर आणि हृदयविकाराचा वाढतोय धोका; नाव आणि कारणं माहित पडली तर पुन्हा कधीही खाणार नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चिकनच्या काही विशिष्ट भागांमध्ये इतकी विषारी द्रव्ये आणि बॅक्टेरिया असतात की, ते नीट शिजवूनही मरत नाहीत. अशा वेळी हे भाग खाल्ल्याने शरीरात गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया, चिकनचा कोणता भाग ताटातून दूर ठेवणं तुमच्या आरोग्यासाठी हिताचं आहे.
advertisement
advertisement
1. चिकनचे फुफ्फुस (Chicken Lungs)चिकनमधील सर्वात धोकादायक भाग म्हणजे त्याची फुफ्फुसे. अनेक अभ्यासातून असं समोर आलं आहे की, चिकनच्या फुफ्फुसात असे अनेक जीवाणू (Bacteria) असतात जे खूप जास्त तापमानावर शिजवल्यानंतरही पूर्णपणे नष्ट होत नाहीत. हे जीवाणू मानवी शरीरात गेल्यावर पचनाच्या समस्या आणि संसर्ग निर्माण करू शकतात. त्यामुळे चिकन खरेदी करताना किंवा खाताना फुफ्फुसे खाणे टाळावे.
advertisement
2. चिकनची मान (Chicken Neck)अनेकांना चिकनची मान कुरतडून खायला आवडते. पण, मानेच्या भागात लिम्फ नोड्स (Lymph Nodes) असतात. यामध्ये शरीरातील विषारी द्रव्ये आणि बॅक्टेरिया साठलेले असतात. तसेच, कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्स आणि हार्मोन्सचे इंजेक्शन अनेकदा मानेच्या भागात दिले जाते. त्यामुळे हा भाग खाल्ल्याने मानवी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही वाढू शकतो.
advertisement
3. चिकनचे पाय (Chicken Feet)काही लोक चिकनचे पाय आवडीने खातात. मात्र, हे पाय कोंबडीच्या शरीराचा असा भाग आहेत जे जमिनीवरील घाणीच्या थेट संपर्कात येतात. या भागावर कितीही प्रक्रिया केली तरी त्यातील काही सूक्ष्मजीव पूर्णपणे जात नाहीत. तसेच यात चरबीचे प्रमाण जास्त असल्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो.
advertisement
advertisement
advertisement
चिकन खाताना 'या' गोष्टींची काळजी घ्यास्वच्छता: चिकन नेहमी कोमट पाण्यात मीठ आणि हळद टाकून स्वच्छ धुवावे.नीट शिजवा: चिकन कधीही अर्धवट शिजलेले (Undercooked) खाऊ नका. यामुळे 'साल्मोनेला' सारख्या बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.कमी मसाले: चिकनची चव वाढवण्यासाठी अति मसाले आणि तेलाचा वापर टाळावा, ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य टिकून राहील.
advertisement
advertisement









