'शेवटी माणूस हा आपला हिंदू, रुपाली चाकणकरांची काहीच चूक नाही' दत्तात्रय भरणेंकडून जोरदार पाठराखण
- Reported by:JITENDRA JADHAV
- Published by:Sachin S
Last Updated:
या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा काही दोष नाही, रूपाली चाकणकर या काही स्वतःहून गेलेल्या नाहीत कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असतील, महाराजाचं दर्शन झालं असेल
पुणे: ज्योतिष, तंत्र मंत्राच्या नावाखाली महिलेचं शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरातमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या चांगल्या अडचणीत सापडल्या आहे. सर्वच स्तरातून चाकणकर यांच्यावर टीका होत आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र रूपाली चाकणकर यांची पाठराखण केली आहे. या प्रकरणात त्यांची कोणतीही चूक नाही, असं म्हणत भरणे यांनी क्लिन चीटच देऊन टाकली.
भोंदूबाब अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांची आता राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. इंदापूरच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकर यांची जोरदार पाठराखण केली आहे.
"मी आता माळवाडीमध्ये आलो आहे, इथं आल्यावर सरपंचाने म्हटलं एक महाराज आहे, त्यांच्याकडे चला, आता सरपंच बाळासाहेबांनाच माहितीये ते महाराज कोण आहे, आता ते महाराज चांगले आहे की भोंदू आहे, हे आम्हाला काय माहिती. रुपाली चाकणकर यांचा काहीही दोष नाही. शेवटी माणूस हा आपला हिंदू आहे. त्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या असेल, त्या काही स्वत: हुन गेल्या नसतील. तिथे गेल्यावर दर्शन झालं" असं म्हणत दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांची चूक नसल्याचं म्हटलंय.
advertisement
[video width="848" height="478" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/WhatsApp-Video-2026-03-19-at-15.42.13-2026-03-fbe4356e74ed6b220d62c8cfe084b728.mp4"][/video]
तसंच, "या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचा काही दोष नाही, रूपाली चाकणकर या काही स्वतःहून गेलेल्या नाहीत कुठेतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले असतील, महाराजाचं दर्शन झालं असेल किंवा त्या भेटल्या असतील आपण कोणाला तरी गुरू मानतो, यात रूपाली चाकणकर यांची कुठलीही चूक नाही. मला जर कोण कुठे चल म्हटलं तर अन् मी गेलो आणि पुढच्याने माझा फोटो काढला त्यावरून काय झालं तर यात काय माझी चूक? असा प्रति प्रश्न आहे भरणे यांनी विचारला आहे.
Location :
Indapur,Pune,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 4:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'शेवटी माणूस हा आपला हिंदू, रुपाली चाकणकरांची काहीच चूक नाही' दत्तात्रय भरणेंकडून जोरदार पाठराखण








