Astrology: 18 मार्चपासून 40 दिवस भाग्याचे! उगवता बुध 5 राशींची झोळी भरणार, कधीपासूनची इच्छा पूर्ण
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Astrology: बुधाची बदलती स्थिती काही राशींना अनपेक्षित लाभाची ठरणार आहे. कधीकधी आयुष्यात सर्व काही सुरळीत चालू असतानाही कामात मानसिक त्रास-अडचणी येतात. निर्णय घेणे गुंतागुंतीचे होते आणि संधी हातातून निसटून जातात. पण, आता 18 मार्च 2026 पासून असाच एक बदल घडणार आहे जो पुढील 40 दिवसांसाठी काही राशींसाठी नवीन संधी निर्माण करू शकतो.
advertisement
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाला मन, तर्क, संवाद आणि व्यवसायाचा घटक मानले जाते. जेव्हा हा ग्रह बलवान स्थितीत असतो, तेव्हा लोकांच्या विचार करण्याच्या आणि समजण्याच्या पद्धतीत बदल होऊ लागतो. 18 मार्च रोजी बुध ग्रहाच्या उदयामुळे, तो त्याच्या प्रभावी स्थितीत आलाय आणि त्याचा प्रभाव 27 एप्रिल 2026 पर्यंत असेल. या काळात, संवाद, शिक्षण, लेखन, विपणन किंवा व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना विशेष फायदा होऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, जे आपल्या बुद्धीचा वापर करतात त्यांच्यासाठी हा काळ अधिक फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अधिक सक्रिय राहण्याचा आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि तुमच्या शब्दांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येईल. मेष राशीत्या अनेकांना असे वाटेल की मेहनतीचे फळ अखेर मिळत आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर ते परत मिळण्याची चिन्हे दिसू शकतात. घरातील भावंडांसोबतचे संबंधही सुधारू शकतात.
advertisement
advertisement
तूळ राशीसाठी अनेक रखडलेले प्रकल्प अचानक पुढे सरकू शकतात. कधीकधी बऱ्याच काळापासून योजना आखलेल्या असतात, पण योग्य वेळ आलेली नसते ही अशी वेळ असू शकते, ज्याने गोष्टी मार्गी लागण्यास सुरुवात होईल. कौटुंबिक सहल किंवा धार्मिक यात्रेचेही नियोजन केले जाऊ शकते. समाजात लोक तुमच्या मतांना अधिक महत्त्व देतील.
advertisement
धनू राशीसाठी हा काळ रिलेशन सुधारण्याची संधी घेऊन येऊ शकतो. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीमुळे दीर्घकाळापासून संघर्ष होत असेल, तर आता तो सोडवण्याची संधी असू शकते. व्यावसायिक भागीदारीतील विश्वासही वाढेल आणि एक मोठा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. काही लोकांना कायदेशीर बाबींमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
कुंभ राशीसाठी बुध ग्रहाच्या उदयामुळे आर्थिक बाबींना चालना मिळू शकते. शेअर बाजार किंवा जुन्या गुंतवणूक योजनांमधून फायदा मिळू शकतो. यासोबतच, तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा होईल आणि काहीजण नवीन नोकरी सुरू करण्याचा विचारही करू शकतात. मुलांचा अभ्यास किंवा त्यांच्या यशामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होऊ शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








