Mira Road Flyover Bridge: इंजिनिअरिंगचा अजब नमुना, 4 पदरी पूल पुढे 2 पदरी; मुंबई मेट्रोच्या पुलाचा VIDEO व्हायरल
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मीरा भाईंदरमधील डबल डेकर ब्रिजचे नागरिकांकडून कौतुक केले जात होते. परंतु आता हाच ब्रिज नागरिकांच्या मनातून उतरलेला आहे. त्यामुळे अनेकांकडून ब्रिजवर टीका केली जातेय.
सध्या सोशल मीडियावर दहिसर पूर्व ते भाईंदर दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मुंबई मेट्रो लाईन 9 म्हणून ओळखली जाणारी दहिसर पूर्व ते भाईंदर दरम्यानचा प्रवास पूर्णपणे तयार असून मार्ग सध्या उद्धाटनाच्या प्रतिक्षेत आहे. अशातच या मेट्रो मार्गाच्या खाली ब्रिज बांधला जात आहे. त्यामुळे हा डबल डेकर ब्रिज सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) या डबल डेकर ब्रिजची रचना केली आहे.
डबल डेकर ब्रिजचे या आधी नागरिकांकडून कौतुक केले जात होते. परंतु आता हाच ब्रिज नागरिकांच्या पसंदीस आलेला नाही. त्यामुळे अनेकांकडून या ब्रिजवर टीका केली जात आहे. सोशल मीडियावर या ब्रीजचे फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांकडून 'हा काय प्रकार?' असा प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे. 'जेम्स ऑफ मीरा भाईंदर' नावाच्या एक्स अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये, वाहतुकीसाठी बनवण्यात आलेला हा चार पदरी ब्रिज, पुढे जाऊन फक्त दोन पदरीच तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा ब्रिज पाहून नागरिकांकडून टिका केली जात आहे.
advertisement
MMRDA कडून या पुलाची निर्मिती केली जात असून लवकरच MMRDA या ब्रिजबद्दलचा खुलासा करण्याची शक्यता आहे. ब्रीजसाठी 100 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. जर चारपदरी ब्रीज पुढे जाऊन जर दोन पदरी होणार असेल तर वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी ती आणखी वाढेल अशी भीती वर्तवण्यात येत आहे. उड्डाणपुलाच्या रचनेवरून सुरू असलेल्या चर्चेला 'एमएमआरडीए'ने (MMRDA) पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. उड्डाणपूलाची रचना जागेची उपलब्धता आणि भविष्यातील नियोजनाचा भाग असल्याचे सांगितले आहे. सध्या सोशल मीडियावर नागरिकांकडून चहू बाजूंनी एमएमआरडीएकडून टीका केली जात आहे.
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या दाव्यांना उत्तर देताना एमएमआरडीएने म्हटले आहे की, "उड्डाण पुलाचे 4 लेनवरून 2 लेनमध्ये होणारे रूपांतर ही कोणतीही तांत्रिक चूक नाही. केलेल्या नियोजनानुसार, भविष्यात हा पूल भाईंदर पूर्व आणि पश्चिमला जोडण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सध्या भाईंदर पूर्व दिशेचा मार्ग तयार असल्याने तो 2 लेनमध्ये दिसतोय. भविष्यात रेल्वे लाईन ओलांडून भाईंदर पश्चिमेकडे जाणाऱ्या मार्गासाठी बाहेरच्या बाजूने आणखी दोन मार्गिका (Lanes) प्रस्तावित आहेत.", असे एमएमआरडीएने म्हटले आहे. गोल्डन नेस्ट सर्कलजवळ पाच प्रमुख रस्ते एकत्र येतात. त्या भागातील सर्वात वर्दळीच्या जंक्शनपैकी एक- हा उड्डाणपूल 2+2 लेन कॉन्फिगरेशनसह बांधण्यात आला आहे. हा उड्डाणपूल मेट्रो कॉरिडॉरसोबत एकत्रित केला आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना स्लिप रोड देण्यात आले आहेत, जेणेकरून वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल.
advertisement
A 4-lane flyover in Mira-Bhayandar suddenly narrows into just 2 lanes. This double-decker flyover is a part of the Metro Line 9 project by JKumar and is set to be inaugurated in February.
Is this how @MMRDAOfficial designs “infrastructure”?
How did this design get approved? 🤷🏻 pic.twitter.com/ZNfwi1Yf9W
— Gems of Mira Bhayandar (@GemsOfMBMC) January 26, 2026
advertisement
जंक्शनच्या पुढे, भाईंदर पूर्वकडे जाताना विकास आराखड्यानुसार (DP) रस्त्याची रुंदी कमी होतेय. त्यामुळेच, रेल्वे फाटक रोडच्या दिशेने वाहतूक अखंड सुरू राहण्यासाठी मध्यभागात 1+1 लेनचा पूल रॅम्पसह बांधण्यात आला आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेशी (MBMC) समन्वय साधून भविष्यात या पुलाच्या रुंदीकरणाची तरतूद ठेवण्यात आली आहे. दोन्ही बाजूला प्रत्येकी 1+1 Lane वाढवून पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम केली जाणार आहे. हा प्रस्ताव सध्या नियोजनाच्या टप्प्यावर असून सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर याचे काम हाती घेतले जाईल. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या प्राथमिक उद्देशाने या पुलाची बांधणी करण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 5:02 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mira Road Flyover Bridge: इंजिनिअरिंगचा अजब नमुना, 4 पदरी पूल पुढे 2 पदरी; मुंबई मेट्रोच्या पुलाचा VIDEO व्हायरल









