Baba Vanga Predictions : 'या' वर्षी सोनं खरेदी करायला पाहिजे? बाबा वांगानं केलेली भविष्यवाणी सोशल मीडियावर होतेय व्हायरल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
baba vanga predictions 2026 : सोन्याच्या किमती ज्या वेगाने वाढत आहेत, ते पाहून आता सामान्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, "सोनं आता हाताबाहेर जाणार का?"
आपल्या घरात एखादं लग्न कार्य असो किंवा गुंतवणुकीचा विचार, आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे 'सोन्याचा दागिना'. सोनं केवळ सौंदर्याचा दागिना नाही, तर भारतीयांसाठी तो संकटाच्या काळातील सर्वात मोठा आधार मानला जातो. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दुकानाकडे पाय वळवताना सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. सोन्याच्या किमती ज्या वेगाने वाढत आहेत, ते पाहून आता सामान्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, "सोनं आता हाताबाहेर जाणार का?"
advertisement
advertisement
सध्या भारतामध्ये 10 ग्रॅम (एक तोळा) सोन्याची किंमत 1.60 लाख रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. शेअर बाजारातील अस्थिरता आणि जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती यामुळे गुंतवणूकदारांनी रोकड पैशापेक्षा सोन्याला 'सेफ हेवन' मानून त्यात मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळेच सोन्याच्या किमतींनी आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
advertisement
2026 मध्ये काय होणार? बाबा वांगा यांचे भाकीतबाबा वांगा यांच्या दाव्यानुसार, 2026 मध्ये संपूर्ण जग एका महाभयंकर आर्थिक मंदीचा सामना करेल. बँकिंग व्यवस्था कोलमडून पडू शकते, अशी भीती या भविष्यवाणीत व्यक्त करण्यात आली आहे. जेव्हा जेव्हा कागदी चलनाची किंमत कमी होते किंवा बँकांवरचा विश्वास उडतो, तेव्हा लोक सोन्याकडे वळतात. याच भीतीपोटी सध्या सोन्याची खरेदी वाढली असून भाव गगनाला भिडले आहेत.
advertisement
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार, 2026 पर्यंत सोन्याच्या दरात आणखी 25 ते 40 टक्क्यांची वाढ होऊ शकते. जर हे गणित खरे ठरले, तर आज 1.60 लाखावर असलेले सोने 1.82 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हे ऐकूनच सर्वसामान्यांच्या अंगावर काटा येत आहे, कारण अशा दरात सोनं खरेदी करणं हे मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर असेल.
advertisement
तज्ज्ञ काय म्हणतात? घाबरून जाऊ नकाबाजारातील तज्ज्ञांच्या मते, बाबा वांगा यांच्या भविष्यवाणीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची गरज नाही. सोन्याचे दर हे केवळ अफवांवर नाही, तर व्याजाचे दर, महागाई आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर अवलंबून असतात. सोन्याचे भाव जरी वाढत असले, तरी त्यात 'करेक्शन' (घसरण) नक्कीच येईल. त्यामुळे घाईघाईत आपली मालमत्ता विकून किंवा कर्ज काढून सोन्यात गुंतवणूक करू नका.
advertisement
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाच्या टिप्स1. थोडी-थोडी गुंतवणूक करा: सोन्याचे भाव वाढणार म्हणून एकदम मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी 'एसआयपी' (SIP) प्रमाणे थोड्या प्रमाणात गुंतवणूक करा.2. अफवांकडे दुर्लक्ष करा: सोशल मीडियावरील दाव्यांमुळे घाबरून निर्णय घेऊ नका. आपल्या मूळ आर्थिक नियोजनावर ठाम राहा.3. सोन्याचा इतिहास: सोने नेहमी दीर्घकाळासाठी (Long Term) चांगला परतावा देते, पण अल्पकालीन चढ-उतारात नुकसान होण्याची शक्यता असते.
advertisement










