advertisement

Winter Health Tips : हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्याने खरंच हाडं कमकुवत होतात? पाहा तज्ज्ञांचे मत

Last Updated:

Bathing with hot water in winter : खरंच हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी अपायकारक आहे का? या संदर्भात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. पुलक वात्स्य यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्पष्ट माहिती दिली आहे.

गरम पाण्याने अंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?
गरम पाण्याने अंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?
मुंबई : हिवाळा सुरू होताच अनेक जण गरम पाण्याने अंघोळ करण्यास प्राधान्य देतात. मात्र याच काळात एक गैरसमजही ऐकायला मिळतो की, गरम पाण्याने अंघोळ केल्याने हाडे कमजोर होतात किंवा हाडांमधील कॅल्शियम वितळते. त्यामुळे अनेक लोक संभ्रमात पडतात. खरंच हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी अपायकारक आहे का? या संदर्भात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. पुलक वात्स्य यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्पष्ट माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया त्यांचे मत काय आहे.
गरम पाण्याने अंघोळ केल्याने हाडे कमकुवत होतात का?
- हा पूर्णपणे गैरसमज आहे.
- गरम पाण्यामुळे हाडांमधील कॅल्शियम वितळत नाही.
- हाडांची मजबुती ही व्हिटॅमिन D, कॅल्शियम, प्रोटीनचे सेवन आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते.
- थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ केल्याचा हाडांच्या ताकदीवर थेट परिणाम होत नाही.
हिवाळ्यात रोज अंघोळ करणे आवश्यक आहे का?
- हिवाळा असला तरी रोज अंघोळ करणे ही चांगली सवय आहे.
advertisement
- यामुळे स्वच्छता (हायजीन) योग्य राहते.
- फक्त थंडीमुळे रोज अंघोळ टाळणे यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
- मात्र ज्यांना चक्कर येणे, तोल जाण्याची समस्या किंवा पडण्याचा धोका अधिक असतो. अशा लोकांना डॉक्टर 2-3 दिवसांतून एकदा अंघोळ करण्याचा सल्ला देतात.
खूप गरम पाणी वापरणे नुकसानदायक ठरू शकते का?
- हाडांसाठी गरम पाणी अपायकारक नसले तरी खूप गरम पाणी त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकते.
advertisement
- जास्त गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल नष्ट करते.
- त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे, रॅशेस येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
- खूप वेळ गरम पाण्याने अंघोळ केल्यास काही लोकांमध्ये रक्तदाब कमी होण्याचाही धोका असतो.



 










View this post on Instagram























 

A post shared by Pulak Vatsya (@dr.pulakvatsya)



advertisement
हिवाळ्यात अंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती?
- फार गरम पाणी वापरणे टाळावे.
- पाणी कोमट असावे, जेणेकरून थंडीही लागू नये आणि त्वचेला त्रासही होऊ नये.
- अंघोळीनंतर त्वचा नीट पुसून घ्यावी.
- त्वचा कोरडी पडू नये म्हणून मॉइश्चरायझर किंवा तेल लावावे.
- योग्य तापमानाच्या पाण्याने अंघोळ केल्यास हिवाळ्यातही स्वच्छता आणि आरोग्य दोन्ही टिकवता येते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Health Tips : हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्याने खरंच हाडं कमकुवत होतात? पाहा तज्ज्ञांचे मत
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement