advertisement

India-EU मुक्त व्यापार करार; Mother of All Dealsमुळे तुम्हाला काय फायदा होणार? स्वस्त होणाऱ्या वस्तूंची संपूर्ण यादी

Last Updated:

India-EU Trade Deal: भारत–युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्थैर्य आणि सामायिक समृद्धीचा नवा आराखडा असल्याचे संबोधले आहे. या ऐतिहासिक करारामुळे लक्झरी कार्स, वाइन, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स स्वस्त होणार असून भारतीय उद्योगांना युरोपच्या बाजारात मोठी संधी मिळणार आहे.

News18
News18
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारत–युरोपियन युनियन (EU) मुक्त व्यापार कराराला (FTA) “जागतिक भल्यासाठी सामायिक समृद्धीचा नवा आराखडा” असे संबोधले. सध्या जागतिक व्यवस्थेत अस्थिरता आणि गोंधळाचे वातावरण असताना भारत–EU भागीदारी जगाला स्थैर्य देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारत–EU FTA च्या वाटाघाटी पूर्ण झाल्यानंतर युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डर लेयेन यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी बोलत होते.
हे देखील वाचा: महाराष्ट्राचा डबल फायदा! इचलकरंजी,कोल्हापूर,पुणे,मुंबई, ठाणे होणार एक्स्पोर्ट हब
हा केवळ व्यापार करार नाही. भारताने आपल्या इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार पूर्ण केला आहे. भारत–EU सहकार्य ही जागतिक भल्यासाठीची भागीदारी आहे, असे मोदी म्हणाले. समुद्री क्षेत्र, सायबर सुरक्षेसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये या करारामुळे सहकार्य वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.
advertisement
लक्झरी कार्स स्वस्त होणार
भारत–EU FTA अंमलात आल्यानंतर BMW, मर्सिडीज-बेंझ, लॅम्बॉर्गिनी, पोर्शे, ऑडी यांसारख्या युरोपियन लक्झरी कार्स भारतात स्वस्त होण्याची शक्यता आहे. हा करार पुढील वर्षी लागू होण्याची शक्यता असून, त्याअंतर्गत कोटा-आधारित आयात शुल्क सवलती दिल्या जाणार आहेत.
करारानुसार 15 हजार युरोपेक्षा (सुमारे 16 लाख रुपये) अधिक किमतीच्या कार्सवर सुरुवातीला 40% आयात शुल्क आकारले जाईल. पुढील टप्प्यात हे शुल्क कमी करत 10% पर्यंत आणले जाणार आहे. यामुळे लक्झरी कार्सच्या किमतींमध्ये लाखो रुपयांची घट होऊ शकते.
advertisement
देशांतर्गत ऑटोमोबाईल उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी ही सवलत ‘कोटा’ मर्यादेत देण्यात आली आहे, असे वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. EU मात्र भारतीय वाहनांवरील आयात शुल्क टप्प्याटप्प्याने पूर्णपणे हटवणार आहे.
सध्या भारतात सुमारे 3.8 कोटी रुपयांपासून विक्री सुरू असलेल्या लॅम्बॉर्गिनीसारख्या ब्रँड्सना, जे पूर्णपणे आयात (CBU) वाहनांवर अवलंबून आहेत, या कराराचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
advertisement
वाइन स्वस्त, भारतीय वाइनला युरोपचा मार्ग
या करारामुळे युरोपियन वाइन भारतात कमी दरात उपलब्ध होणार आहेत. सध्या 150% असलेले आयात शुल्क महाग वाइनसाठी 20% पर्यंत कमी केले जाईल. मात्र 2.5 युरोपेक्षा कमी किमतीच्या वाइनवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
त्याच वेळी भारतीय वाइनला EU च्या 27 देशांमध्ये प्रवेश मिळणार असून, युरोपमधील वाढत्या भारतीय समुदायासाठी हा मोठा बाजार ठरू शकतो. EU भारतीय वाइनवरील आयात शुल्क पूर्णपणे हटवणार आहे.
advertisement
एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ऑटोप्रमाणेच वाइन हे भारतीय उद्योगासाठी महत्त्वाचे निर्यात क्षेत्र आहे. त्यामुळे सात वर्षांत टप्प्याटप्प्याने शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
2024-25 मध्ये भारताकडून EU ला वाइन निर्यात 14 लाख डॉलर इतकी होती, तर मद्यपेयांच्या एकूण निर्यातीचे मूल्य 2.45 कोटी डॉलर होते.
औषधे, मोबाईल, स्पेअर पार्ट्स स्वस्त
भारत–EU FTA मुळे कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवरील आयात औषधे तसेच वैद्यकीय उपकरणे स्वस्त होतील. त्याचबरोबर, भारतात तयार होणाऱ्या औषधांना युरोपच्या 27 बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळेल.
advertisement
विमानांच्या सुटे भाग, मोबाईल फोन, आणि हाय-टेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयात शुल्क हटवण्यात येणार असल्याने भारतातील उत्पादन खर्च कमी होईल आणि ग्राहकांसाठी गॅजेट्स स्वस्त होतील.
स्टील, केमिकल्स, दागिने, कपडे
लोखंड, स्टील आणि केमिकल उत्पादनांवर शून्य आयात शुल्काचा प्रस्ताव असून, यामुळे बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रातील कच्चा माल स्वस्त होऊ शकतो. परिणामी घरांच्या किमतींवरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय भारतीय वस्त्र, लेदर आणि दागिन्यांना युरोपियन बाजारात मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
India-EU मुक्त व्यापार करार; Mother of All Dealsमुळे तुम्हाला काय फायदा होणार? स्वस्त होणाऱ्या वस्तूंची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement