T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर 'रिटायरमेंट'चा बॉम्ब, टीम इंडियाच्या ओपनरचा गौप्यस्फोट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने रिटायरमेंटबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने रिटायरमेंटबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. मनात निवृत्तीचा विचार आला होता, पण काही वेळ अजून शिल्लक आहे, असं वाटलं, त्यामुळे निवृत्ती घेतली नसल्याचं केएल राहुल म्हणाला आहे. केएल राहुलने इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनला मुलाखत दिली आहे, त्यामध्ये त्याने निवृत्तीच्या विचाराबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. वेळ आल्यावर आपण शांतपणे निघून जाऊ, निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलणार नाही. हा निर्णय कठीण असेल, पण क्रिकेटच्या पलीकडेही आयुष्य आहे, असं राहुल म्हणाला आहे.
'मी याबद्दल विचार केला आहे. मला वाटत नाही निवृत्ती इतकी कठीण असेल, जर तुम्ही स्वतःसोबत प्रामाणिक असाल, तर वेळ आल्यावर निवृत्ती पुढे ढकलण्यात काही अर्थ नाही, पण त्यासाठी नक्कीच थोडा वेळ लागेल', असं 33 वर्षांचा केएल राहुल म्हणाला आहे.
केएल राहुलने 67 टेस्टमध्ये 35.8 च्या सरासरीने 4,053 रन केल्या आहेत. तसंच 94 वनडे सामन्यांमध्ये त्याने 50.9 च्या सरासरीने 3,360 रन आणि 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 37.75 च्या सरासरीने आणि 139 च्या स्ट्राईक रेटने 2,265 रन केल्या आहेत.
advertisement
'मी स्वतःला सुपरस्टार किंवा खूप महत्त्वाची व्यक्ती मानत नाही, त्यामुळे मला भविष्यात निवृत्तीचा निर्णय घेणे सोपे होईल. शांतपणे खेळणं सोडून द्या. तुमच्याकडे जे आहे त्याचा आनंद घ्या. तुमचे कुटुंब आहे, तुम्हाला जे आवडतं ते करा. हा सगळ्यात कठीण भाग आहे, म्हणून मी स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की मी फारसा महत्त्वाचा नाही. आपल्या देशात क्रिकेट सुरू राहील. आयुष्यात आणखी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी वडील झाल्यापासून आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. हीच माझी मानसिकता आहे', असं वक्तव्य केएल राहुलने केलं आहे.
advertisement
दुखापतींसोबत लढण्याच्या कठीण लढाईबद्दलही केएल राहुल या मुलाखतीमध्ये बोलला आहे. 'मला अनेकदा दुखापत झाली आहे, हे सगळ्यात कठीण आव्हान आहे. फिजिओथेरपिस्ट किंवा सर्जन तुम्हाला वेदना देत नाहीत, पण मानसिक संघर्ष असतो, ज्यात तुम्ही हार मानता', असंही राहुल म्हणाला आहे. केएल राहुल हा गुरूवारी मोहाली येथे पंजाबविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या सामन्यात कर्नाटककडून खेळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 4:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर 'रिटायरमेंट'चा बॉम्ब, टीम इंडियाच्या ओपनरचा गौप्यस्फोट!







