advertisement

Wrinkles : सुरकुत्यांचेही असतात वेगवेगळे प्रकार, प्रत्येक सुरकुतीला, रेषांना आहेत नावं, सुरकुत्यांविषयीची खास माहिती

Last Updated:

सुरकुत्या येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केस पांढरं होणं किंवा शरीरात होणाऱ्या इतर बदलांप्रमाणेच सुरकुत्या हे वृद्धत्वाशी संबंधित लक्षण आहे. वय वाढत असताना, आपल्या त्वचेवर सुरकुत्या किंवा रेषा दिसतात. त्या आपल्या तळहातावरील रेषांसारख्या दिसतात. सुरकुत्यांचे आणि चेहऱ्यावरच्या बारीक रेषांचेही वेगवेगळे प्रकार असतात.

News18
News18
मुंबई : वयानुसार आपल्या शरीरात बदल होत असतात. शारीरिक बदलांमधे, चेहऱ्यावर दिसणारे बदल म्हणजे वयानुसार येणाऱ्या सुरकुत्या. त्वचेवर सुरकुत्या येणं हे वयानुसारच्या बदलांचं लक्षण आहे. चेहऱ्यावरच्या बारीक रेषा, डोळ्यांभोवती दिसणाऱ्या रेषा किंवा आपण हसतो तेव्हा सुरकुत्या दिसतात.
सुरकुत्या येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. केस पांढरं होणं किंवा शरीरात होणाऱ्या इतर बदलांप्रमाणेच सुरकुत्या हे वृद्धत्वाशी संबंधित लक्षण आहे. वय वाढत असताना, आपल्या त्वचेवर सुरकुत्या किंवा रेषा दिसतात. त्या आपल्या तळहातावरील रेषांसारख्या दिसतात. सुरकुत्यांचे आणि चेहऱ्यावरच्या बारीक रेषांचेही वेगवेगळे प्रकार असतात.
advertisement
काही चेहऱ्यांवर बारीक रेषांच्या स्वरूपात दिसतात, तर काही डोळ्यांभोवती किंवा ओठांभोवती खोल रेषांच्या स्वरूपात दिसतात. त्या सहसा चेहरा, मान आणि हातांवर अधिक दिसतात, परंतु त्या शरीरावर कुठेही येऊ शकतात.
सुरकुत्यांचे प्रकार -
कपाळावरच्या सुरकुत्या - Forehead lines : कपाळावरील आडव्या रेषा ज्या तुम्ही भुवया उंचावता तेव्हा दिसतात.
Frown Lines : दोन भुवयांच्या मधे दिसतात त्या रेषा. ताण किंवा राग आल्यानं या दिसून येतात.
advertisement
बनी लाइन्स : हसताना नाकाच्या वरच्या भागात बारीक रेषा तयार होतात.
Crow's Feet : डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यांवर कावळ्याचा पंजासारख्या रेषा असतात, ज्यांना स्माईल लाईन्स असंही म्हणतात.
Laughter lines : नाकापासून तोंडाच्या कोपऱ्यांपर्यंत पसरलेल्या रेषा, वय आणि सूर्यप्रकाशामुळे गडद होत जातात.
लिप लाइन्स : ओठांवर आणि ओठांच्या वरच्या भागात उभ्या बारीक रेषा तयार होतात.
advertisement
Marionette lines : तोंडाच्या कोपऱ्यापासून हनुवटीपर्यंत पसरलेल्या रेषा, ज्यामुळे चेहरा काही वेळा ओढल्यासारखा किंवा निस्तेज दिसतो.
वय वाढत असताना, त्वचा पातळ, कोरडी आणि कमी लवचिक होते. यासाठी जबाबदार असलेली दोन महत्त्वाची प्रथिनं म्हणजे कोलेजन आणि इलास्टिन. ही प्रथिनं त्वचेला कडकपणा आणि लवचिकता प्रदान करतात, पण कालांतराने त्यांचं उत्पादन कमी होतं.
advertisement
याव्यतिरिक्त, हसणं, डोळे मिचकावणं किंवा रागावणं यासारख्या चेहऱ्यावरील हावभावांमुळे देखील सुरकुत्या येऊ शकतात. वयानुसार त्वचेची लवचिकता कमी होते, ज्यामुळे या रेषा कायमच्या राहतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Wrinkles : सुरकुत्यांचेही असतात वेगवेगळे प्रकार, प्रत्येक सुरकुतीला, रेषांना आहेत नावं, सुरकुत्यांविषयीची खास माहिती
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement