क्रिकेट खेळले, पण लायटरवरून ठिणगी पडली, मित्राला SUV ने चिरडलं, डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला मृत्यू!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
क्रिकेट मैदानावर एकत्र खेळणारे दोन मित्र सामन्यानंतर एकमेकांच्या जीवावर उठले. राग आणि दारूच्या नशेमध्ये 33 वर्षांच्या प्रशांतची एसयूव्ही खाली चिरडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
क्रिकेट मैदानावर एकत्र खेळणारे दोन मित्र सामन्यानंतर एकमेकांच्या जीवावर उठले. राग आणि दारूच्या नशेमध्ये 33 वर्षांच्या प्रशांतची एसयूव्ही खाली चिरडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आरोपी रोशन हेगडे (37) हा आयटी कंपनीमध्ये कामाला आहे. पोलिसांनी त्याला हत्येप्रकरणी अटक केली आहे. संपूर्ण घटना आरोपीच्या कारमधील डॅशकॅमवर रेकॉर्ड झाली आहे.
रविवारी स्थानिक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खेळ संपल्यानंतर, प्रशांत आणि रोशन पार्टी करण्यासाठी बसले. कोणीही कल्पना केली नव्हती की ही त्यांची शेवटची भेट असेल. बिअरच्या बाटल्यांपासून सुरू झालेला हा हल्ला एसयूव्हीने चिरडल्यानंतर संपला. या हल्ल्यात प्रशांतच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी रोशनची टाटा सफारी जप्त केली आहे. एसयूव्हीच्या डॅशकॅममध्ये ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे, ज्याचा पोलीस पुरावा म्हणून वापर करत आहेत.
advertisement
सिगरेट लायटरवरून वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये साध्या सिगारेट लाईटरवरून वाद सुरू झाला. दोघे मित्र मॉलच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानात बसून दारू पित होते. दारू पिऊन झाल्यावर दोघांमधला वाद शिवीगाळ करण्यापर्यंत पोहोचला. दोघांनी एकमेकांवर बिअरच्या बाटल्यांनी हल्ला केला, ज्यात आरोपी हेगडेच्या जिभेला दुखापत झाली.
वादानंतर हेगडेने त्याच्या टाटा सफारीमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण प्रशांत गाडीच्या फूटरेस्टवर चढला. यानंतर हेगडेने जाणूनबुजून वेग वाढवला आणि गाडी थेट झाडावर आणि भिंतीवर आदळली. बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक्स सिटी पोलिसांनी एका तासाच्या आत आरोपी हेगडेला अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Bangalore,Karnataka
First Published :
Jan 27, 2026 7:59 PM IST
मराठी बातम्या/देश/
क्रिकेट खेळले, पण लायटरवरून ठिणगी पडली, मित्राला SUV ने चिरडलं, डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला मृत्यू!









