2 मंत्री आजारी, 10 आमदारांना ताप, 1355 पोलिसांनाही High BP चा त्रास, विधीमंडळातून मोठी अपडेट समोर

Last Updated:

नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यान, दोन मंत्र्यांसह दहा आमदार आणि जवळपास १३५५ कर्मचारी आजारी पडल्याचं समोर आलं आहे. यातील अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

News18
News18
सध्या नागपुरात महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या अधिवेशनाला विशेष महत्त्व होतं. अधिवेशनात सरकारकडून काय निर्णय घेतले जाणार? काय घोषणा केल्या जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. एकीकडे हे अधिवेशन सुरू असताना आता विधीमंडळातून एक खळबळजनक माहिती समोर आलं आहे. या अधिवेशनादरम्यान, दोन मंत्र्यांसह दहा आमदार आणि जवळपास १३५५ कर्मचारी आजारी पडल्याचं समोर आलं आहे. यातील अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानीत आलेल्या आमदारांना नागपूरची बोचरी थंडी मानवली नसल्याचं पुढे आले. १० आमदारांना ताप आल्याने विधिमंडळ परिसरातील वैद्यकीय उपचार कक्षात त्यांना उपचार घ्यावे लागले. याशिवाय वेगवेगळ्या भागांतून आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह १,३५५ जणांना सर्दी, खोकल्याचा त्रास झाला. अनेक पोलिसांचा रक्तदाब वाढल्याने त्यांच्यावरही उपचार करण्यात आले.
आमदार शिवाजी पाटील, प्रशांत बंब, बालाजी किन्हीकर, मनीषा कायंदे, बालाजी कल्याणकर, कपिल पाटील, अशोक माने, बाबुराव कदम कोहळीकर, प्रसाद लाड, हेमंत ओगुले अशा लोकप्रतिनिधींनी विधिमंडळातील वैद्यकीय कक्षात उपचार घेतले.
advertisement
अधिवेशनासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारीही नागपुरात आले आहेत. विधानभवनाच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पण यातील अनेक पोलिसांचा उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील या कक्षातच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सर्दी-खोकल्याचाही अनेकांना त्रास झाला. अतिमद्यसेवनामुळेही काहींना त्रास झाल्याचीही माहिती समोर येत आहे. एका मराठी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिलं आहे. दोन मंत्र्यांनाही त्रास जाणवल्याने त्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवून या कक्षातून औषध नेले असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
2 मंत्री आजारी, 10 आमदारांना ताप, 1355 पोलिसांनाही High BP चा त्रास, विधीमंडळातून मोठी अपडेट समोर
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement