advertisement

मुंबई-पुण्याच्या पोरांचा धमाका, अमेरिकाला मिळवून दिला T20 वर्ल्ड कपचा पहिला विजय!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेने नेदरलँड्सचा 93 रननी पराभव केला आहे. मुंबई-पुण्यात जन्मलेले दोन खेळाडू युएसएच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

मुंबई-पुण्याच्या पोरांचा धमाका, अमेरिकाला मिळवून दिला T20 वर्ल्ड कपचा पहिला विजय!
मुंबई-पुण्याच्या पोरांचा धमाका, अमेरिकाला मिळवून दिला T20 वर्ल्ड कपचा पहिला विजय!
चेन्नई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेने नेदरलँड्सचा 93 रननी पराभव केला आहे. चेन्नईच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अमेरिकेने पहिले बॅटिंग करताना 196 रन केल्या, जी टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील त्यांची दुसरी सर्वोच्च धावसंख्या होती. या आव्हानाचा पाठलाग करताना, नेदरलँड्सला त्यांच्या 20 ओव्हरही पूर्ण खेळता आल्या नाहीत. फक्त 103 रनवर त्यांचा ऑलआऊट झाला.
नेदरलँड्सची टीम 197 रनच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आली तेव्हा भारतीय वंशाचा बॉलर हरमीत सिंगने नेदरलँडला एकामागोमाग एक धक्के दिले. मुंबईत जन्मलेल्या हरमीत सिंगने भेदक बॉलिंग करून 4 ओव्हरमध्ये फक्त 21 रन देऊन 4 विकेट घेतल्या. याशिवाय शेडली व्हॅन शाल्कविकनेही 3 विकेट घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शाल्कविकच्या नावावर यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 11 विकेट आहेत.
advertisement
मुंबईच्या मुलाने धमाका केला.
यूएसएकडून खेळणारा डावखुरा ऑफ-स्पिन बॉलर हरमीत सिंगचा जन्म मुंबईत झाला. हरमीत स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई आणि त्रिपुराकडून खेळला आहे, पण नंतर तो अमेरिकेत स्थलांतरित झाला. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात त्याने चार मौल्यवान विकेट घेतल्या. 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील अमेरिकेचा हा पहिला विजय होता आणि आता त्यांचा फक्त एक सामना शिल्लक आहे. 15 फेब्रुवारीला युएसए नामिबियाविरुद्ध खेळणार आहे.
advertisement
यापूर्वी, सैथेजा मुक्कामालाने अमेरिकेसाठी 51 बॉलमध्ये 79 रनची दमदार अर्धशतकी खेळी केली. शुभम रांजणेनेही 48 रन करत आपला फॉर्म कायम ठेवला. शुभम रांजणे याचा जन्म पुण्यात झाला आहे, तोदेखील हरमीतप्रमाणेच अमेरिकेमध्ये स्थायिक झाला. तर बॉलिंगमध्ये हरमीतने चार, शॅडली व्हॅन डेर लेयनने तीन, मोहम्मद मोहसीनने दोन आणि नोशातुश केंजीगेने एक विकेट घेतली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मुंबई-पुण्याच्या पोरांचा धमाका, अमेरिकाला मिळवून दिला T20 वर्ल्ड कपचा पहिला विजय!
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement